अशातच अभिनेता सैफ अली खान लवकरच नेटफ्लिक्सच्या अॅक्शन थ्रिलर फिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ज्वेल थीफ' मध्ये सैफ अली खान आणि जयदीप अहलावत आमनेसामने येणार आहेत. आज या फिल्मचा टीझर लॉन्च झाला आहे. या कार्यक्रमासाठी फिल्ममधील मुख्य कलाकारांनी हजेरी लावली. यात सैफ अली खानचाही समावेश होता. हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सैफ एखाद्या कार्यक्रमात सहभागी झाला आहे.
advertisement
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते आणि त्याला काही दिवसांसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला होता. अशा स्थितीत त्याला या कार्यक्रमात पाहून सगळेच थक्क झाले आहेत. यावेळी सैफ एकदम फिट वाटत होता. त्याच्या उपस्थितीवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
अनेकजणांना सैफला पाहून आनंद झाला, तर काहींना त्याला पाहून आश्चर्य वाटले. सोशल मीडियावर नेटकरी म्हणत आहेत की सैफ इतक्या लवकर बरा कसा झाला? एकाने कमेंट करत म्हटलं आहे, "ही सर्वांत फास्ट रिकव्हरी आहे." तर, दुसऱ्याने म्हटलं आहे, "सगळं नाटक होतं. सैफवर कोणताही हल्ला झालेला नाही."
