सलमान खानने एकदा त्या कलाकारांबद्दल सांगितले ज्यांना तो मोठा स्टार मानत होता. 2017 मध्ये एका जुन्या मुलाखतीत सलमान म्हणाला होता की, “स्टारडमची तुलना केली तर त्याला असे वाटते की त्यांच्यातील 10 टक्के गुणही आपल्याकडे नाहीत.” यावेळी सलमानने दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांचेही कौतुक केले.
advertisement
पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला होता, “मला वाटत नाही की दिलीप कुमार यांच्यापेक्षा कोणीही मोठा आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन आहेत, ते आजही कार्यरत आहेत आणि सर्वत्र दिसत आहेत. तुम्हाला वाटते की आम्ही लोकप्रिय आहोत, तर हे खरे नाही. मला वाटतं राजेश खन्ना यांच्यापेक्षा मोठं कोणीही नाही आणि दुसरे कुमार गौरव. या दोघांचं स्टारडम मी पाहिलं आहे आणि ते अविश्वसनीय होतं, म्हणून जेव्हा स्टारडमची तुलना केली जाते तेव्हा मला वाटतं माझ्याकडे त्यांच्याइतकं 10% देखील नाही.”
राजेश खन्ना यांनी 1969 ते 1972 दरम्यान सलग 15 सोलो सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी 1966 मध्ये आखरी खत या चित्रपटातून पदार्पण केले. 1967 मध्ये भारताची ही पहिली अधिकृत ऑस्कर एंट्री होती. आराधना, कटी पतंग, गुड्डी, आनंद, बावर्ची यासह अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. नमक हराममध्ये ते इतर अनेक स्टार्ससोबत दिसले होते. अभिनेता राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला लव्ह स्टोरी या चित्रपटाद्वारे रातोरात स्टार बनले. नंतर तेरी कसम, स्टार, नाम आणि कांटे या चित्रपटात ते दिसले.
