कोण आहे ही अभिनेत्री?
बॉलिवूडच्या या अभिनेत्री आपल्या पहिल्याच फिल्ममध्ये हिंदी सिनेसृष्टीतील बादशाहसोबत काम केलं. चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. पण तरीही पहिल्याच चित्रपटानंतर तिने चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
गायत्री जोशी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. गायत्री जोशीने 'स्वदेश' या फिल्ममध्ये शाहरुख खानच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. 2004 मध्ये प्रदर्शित झालेला ‘स्वदेश’ हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात शाहरुख खानने मोहन भार्गव तर गायत्री जोशी यांनी गीता ही भूमिका साकारली होती. पहिल्याच चित्रपटातून गायत्री यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. मात्र, ‘स्वदेश’नंतर गायत्री कोणत्याही दुसऱ्या चित्रपटात दिसली नाही. त्यामुळे ‘स्वदेश’ हाच त्यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला.
advertisement
2005 मध्ये केलं लग्न
गायत्री जोशीने 2004 मध्ये ‘स्वदेश’मध्ये काम केल्यानंतर लगेचच 2005 मध्ये लग्न केलं. तिने आघाडीच्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे मालक आणि उद्योजक विकास ओबेरॉय यांच्याशी विवाह केला. या दांपत्याला विहान ओबेरॉय आणि युवान ओबेरॉय अशी दोन मुले आहेत. 9 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या भारतातील 100 सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती 5.9 अब्ज डॉलर (सुमारे 50,000 कोटी रुपये) इतकी असून, ते 50 व्या स्थानावर आहेत.
20 वर्षांतही गायत्री जोशी अजिबात बदललेल्या नाहीत
गायत्री जोशी जरी चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती अनेकदा कार्यक्रमांमध्ये दिसते. त्यामुळे हे स्पष्ट होते की 20 वर्षांनंतरही गायत्री अजिबात बदललेली नाही. आजही ती तेवढीच निरागस, सुंदर आणि गोड दिसते. 2023 मध्ये गायत्री जोशी आणि विकास ओबेरॉय तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा ते इटलीमध्ये एका भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले होते. इटलीतील सार्डिनिया येथे 2 ऑक्टोबर रोजी लॅम्बोर्गिनी आणि फेरारी यांच्यात झालेल्या भीषण अपघाताने सर्वांनाच धक्का दिला होता. या भीषण दुर्घटनेत दोघेही सुदैवाने बचावले आणि त्यानंतर ते इटलीहून मुंबईला परतले.
