TRENDING:

Shriya Pilgaonkar : 'मला मेंटली जेवण बनवता येतं', श्रिया पिळगावकरचा व्हिडीओ पाहून व्हाल शॉक

Last Updated:

Shriya Pilgaonkar Video : अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने जेवण बनवण्याबाबत असं काही स्टेटमेन्ट दिलं आहे जे ऐकून तुम्ही शॉक व्हाल. श्रियाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
 मुंबई : अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिची 'छलकपट' ही क्राइम, थ्रिलर आणि सस्पेन्स सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये श्रियाने एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. श्रियाने मागील काही वर्षात ओटीटी विश्वात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'मिर्झापूर', 'गिल्टी माइंड', 'द ब्रोकन न्यूज', 'ताजा खबर' सारख्या ओटीटी सीरिज आणि सिनेमांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
News18
News18
advertisement

श्रिया ही ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी आहे. आई वडिलांच्या पाऊल ठेवत श्रियाने देखील अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. पण मोठ्या पडद्याऐवजी तिनं ओटीटी माध्यमात आपली ओळख निर्माण केली. तिची छलकपट ही सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे.

( 'Kissing Scene साठी मी नाही म्हणणार नाही पण...', श्रिया पिळगावकर थेटच बोलली )

advertisement

श्रिया ही गोव्याची आहे. त्यामुळे तिच्या घरी गोवन स्टाइलच जेवण बनतं. श्रिया ही फूडी आहे. वडील सचिन पिळगावकर आणि ती अनेक ठिकाणी फिरताना तिथलं फूड ट्राय करत असतात. पण बऱ्याचदा श्रियाला असा प्रश्न विचारला जातो की तिला स्वयंपाक बनवता येतो का? या प्रश्नाचं अखेर श्रियाने उत्तर दिलंय.

श्रियाला स्वयंपाक कसा करायचा माहिती आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर श्रियाने जे उत्तर दिलं आहे ते ऐकून तुम्हीही शॉक व्हाल.  राजश्री मराठीशी बोलताना श्रिया म्हणाली, "मला मेंटली कुक करता येतं. आता हे आईने ऐकलं तर आई म्हणेल तू मला आधी घरी येऊन डाळ भात करून दाखवं. काही पदार्थ जे मी केलेत, जास्त काही मी किचनमध्ये जाऊन केलेलं नाहीये. पण मला कॉन्फिडन्स आहे की मला कुक करायला आवडेल. मी जास्त केलेलं नाहीये."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

श्रिया पुढे म्हणाली, "या वर्षी माझ्या व्हिजन बोर्डवर लिहिलं आहे की, मला आजीकडून शिकायचं आहे. जे आजीचे पदार्थ आहेत, आम्ही अणसा फणसाची भाजी बनवतो.  स्पेशली सारस्वत ब्राम्हणांमध्ये अणसा फणसाची भाजी बनतात. आमच्या घरी जेवणात गोवन इन्फ्लूएन्स खूप आहे. घरी. पिठल, उकड, पावाचा उपमा, हे सगळं मला शिकायचं आहे. पास्ता वगैरे सोपं आहे पण या गोष्टी शिकायच्या आहेत."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Shriya Pilgaonkar : 'मला मेंटली जेवण बनवता येतं', श्रिया पिळगावकरचा व्हिडीओ पाहून व्हाल शॉक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल