TRENDING:

लाइव्ह शोमध्ये गाता गाता किंचाळली आणि स्टेज सोडून पळाली; गायिकेसोबत हे काय घडलं? Watch Video

Last Updated:

Singer : ही गायिका लाइव्ह शो करत होती. त्यावेळी स्टेजवर तिच्यासोबत असं काही घडलं की गाता गाता किंचाळली आणि शो मधेच सोडून स्टेजववरून पळून गेली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुनंदा शर्मा लाईव्ह शो: गाझियाबादमधील सुनंदा शर्मा यांच्या लाईव्ह शोमध्ये एका चाहत्याने सुरक्षा भेदून स्टेजवर चढल्यामुळे गोंधळ उडाला. या घटनेमुळे घाबरलेल्या गायिकेला आपला कार्यक्रम अर्धवट थांबवून शो सोडावा लागला.
News18
News18
advertisement

सध्या सिंगर यो यो हनी सिंग त्याच्या लाइव्ह शो आणि वादग्रस्त गाण्यांमुळे चर्चेत आला आहे. अशात आणखी एक गायिकाही चर्चेत आली आहे. ही गायिका लाइव्ह शो करत होती. त्यावेळी स्टेजवर तिच्यासोबत असं काही घडलं की गाता गाता किंचाळली आणि शो मधेच सोडून स्टेजववरून पळून गेली.

तुम्ही तिथपर्यंत जा...! अशोक खरात प्रकरणात 'मराठमोळी' अभिनेत्रीही अडकली वादात; महिलांना दिला होता सल्ला

advertisement

एका गायिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही गायिका आहे सुनंदा शर्मा. प्रसिद्ध पंजाबी गायिका. गाझियाबादमधील गोयल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी इथं तिचा शो होता. पण तिथं असं काहीतरी अनपेक्षित घडलं, ज्याची कल्पनाही तिने केली नव्हती. तिलाही यामुळे धक्का बसला.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुनंदा स्टेजवर गात होती.  प्रेक्षक तिच्या गाण्यांवर थिरकत होते. तोच अचानक स्टेजवर एक तरुण आला, त्याने असं काही केलं की सुनंदा घाबरली. ती मोठ्याने किंचाळली आणि तिथून पळत सुटली. सुनंदाचा एक चाहता सुरक्षा भेदून स्टेजवर चढला होता.

advertisement

'क्वीन' इज बॅक पण वेगळ्या अवतारात! कंगना रणौतच्या फिल्मचा सीक्वेल; नाव आणि स्टोरीही बदलली

तो तरुण अचानक स्टेजवर आला आणि सुनंदाच्या पायाजवळ वाकून तिचे पाय पडू लागला. नंतर आपण काहीतरी मोठं केलं असं तो स्टेजवर मिरवू लागला.

काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण झालं. त्या चाहत्याच्या वागण्याने उपस्थितांना धक्का बसला, कारण तो स्टेजपर्यंत कसा पोहोचला हे कोणालाच समजत नव्हतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

नंतर सुरक्षा पथकांनी त्याला स्टेजवरून लगेच खाली उतरवलं. तरी या घटनेचा परिणाम गायिकेच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर सुनंदा शर्मा खूप अस्वस्थ झाली आणि तिने कार्यक्रम थांबवला. प्रेक्षकांनी तिला शो सुरू ठेवण्याची विनंती केली पण तरी ती तिथून निघून गेली. दरम्यान यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
लाइव्ह शोमध्ये गाता गाता किंचाळली आणि स्टेज सोडून पळाली; गायिकेसोबत हे काय घडलं? Watch Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल