व्हिडीओतून दिली रिलेशनशिपची बातमी
अक्षयाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत ती म्हणते, "बऱ्याच जणांना माहिती नाही पण मी गेली 11 वर्ष एका कमिटेड रिलेशनमध्ये आहे. आणि मी ही न्यूज आता ब्रेक करत आहे." तिच्या या वाक्यांमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. काही क्षणांनंतर तिने खुलासा केला की ती रिलेशनशिप तिच्या स्कूटीसोबत आहे आणि तिच्या स्कूटीचं नाव आहे 'मिस्टर रँचो'.
advertisement
( Prajakta Mali: 'खूप चढ-उतार आले, पण 10 वर्षे एकत्र राहिलो', प्राजक्ता माळीची भावनिक पोस्ट )
मिस्टर रँचो - कॉन्स्टंट प्रेम
अक्षया पुढे म्हणते, "आज खूप महिन्यांनी आमची भेट झाली आहे. आम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. जास्त वेळ न घालवता मला माझ्या कॉन्स्टंटसोबत वेळ घालवू द्या." या मजेशीर पण भावनिक व्हिडीओला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तिच्या स्कूटीविषयीचा हा प्रेमभाव अनेकांना भावला आहे.
अक्षया नाईकचं करिअर
अक्षया नाईकने हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत 'अनन्या'ची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली. त्यानंतर ती 'पिंजरा खूबसूरती का' मालिकेत दिसली. त्यानंतर सुंदरा मनामध्ये भरली या मराठी मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. तिच्या सहज अभिनयशैलीमुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनली.
या व्हिडीओतून अक्षयानं प्रेम, हळवेपणा आणि विनोद यांचा उत्तम मिलाफ साधला आहे. तिचा 'मिस्टर रँचो'सोबतचा नातेसंबंध चाहत्यांना भावला. अनेकांनी तिच्या पोस्टवर प्रेमळ प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
