TRENDING:

झापूक झुपूक करत सूरज चव्हाणला टक्कर द्यायला गेल्या 65 वर्षांच्या आजी, दुसऱ्याच डायलॉगला फजिती, पाहा VIDEO

Last Updated:

65 years old aaji video on suraj chavan dialogue : 65 वर्षांच्या आजी सूरज चव्हाणला टक्कर देताना दिसत आहेत. सूरज चव्हाणच्या डायलॉगची हटके फटकेबाजी करणाऱ्या आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण सध्या चांगलाच चर्चेत आहे. टिक टॉक स्टार ते बिग बॉसचा विजेता अशी त्याची नवीन ओळख सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्राच्या मातीतला सूरज त्याच्या हटके डायलॉगबाजीने सगळ्यांच्या लक्षात राहिला. “SQ RQ ZQ बुक्कीत टेंगुळे” असे सूरजचे डायलॉग टिक टॉकवर फेमस होतेच पण या डायलॉगने बिग बॉसमध्येही राडा घातला. थेट रितेश देशमुख पासून अक्षय कुमार झापूक झुपूकवर नाचताना दिसले. तरुणाईमध्ये सूरजच्या झापूक झुपूकची क्रेझ आहेच. पण ज्येष्ठ मंडळी देखील काही कमी नाही. एक 65 वर्षांच्या आजी सूरज चव्हाणला टक्कर देताना दिसत आहेत. सूरज चव्हाणच्या डायलॉगची हटके फटकेबाजी करणाऱ्या आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सूरज चव्हाण
सूरज चव्हाण
advertisement

इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नवरात्रीत तर गरबाचे आणि दांडियाचे अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. त्यातील हा एक व्हिडिओ आहे. sushilsuryawanshi05 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नवरात्रीत पैठणीच्या खेळात 65 वर्षांच्या आजींनी सूरज चव्हाणची स्टाइल मारली आहे.

( Bigg Boss: कितीबी येणार, तरी सरांना नाय म्हणायचं नाही! गुलीगत सूरजनं सांगितला पुढचा प्लॅन )

advertisement

आजींनी फक्त सूरजचे डायलॉगच बोलले नाही तर त्यावर त्यांच्या स्टाइलचा हटके डान्सही करून दाखवला आहे. “झापूक झुपूक झापूक झुपूक, SQ RQ ZQ गणित धोका, बुक्कीत टेंगुळ...” असं म्हणत आजींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'बुक्कीत टेंगुळ' म्हणताना आजींचा अभिनय तर पाहण्यासारखा आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

दरम्यान सूरजला टक्कर देताना आजींनी त्याचा एक डायलॉग मात्र चुकीचा म्हटला आहे. नेटकऱ्यांनी तो डायलॉग त्यांना करेक्ट करून दिला. “गोलीगत धोका” असं सूरज म्हणतो. इथे आजी “गणित धोका” बोलल्या. शब्द जरी चुकले असले तरी आजींचं सूरज आणि त्याच्या डायलॉगवर असलेलं प्रेम पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं. आजींचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
झापूक झुपूक करत सूरज चव्हाणला टक्कर द्यायला गेल्या 65 वर्षांच्या आजी, दुसऱ्याच डायलॉगला फजिती, पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल