प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने सुरेश धस वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. सुरेश धस यांनी यासंदर्भातली आपली नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. सुरेश धस म्हणाले, “मी रश्मिका मंदाना, प्राजक्ताताई, सपना चौधरी यांची फक्त नावं घेतली. का घेतली? आता मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडला. सगळ्या शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आणि तुम्ही कृषीमंत्री असून तिकडे रश्मिका मंदानांचा कार्यक्रम घेता?"
advertisement
( Prajakta Mali on Suresh Dhas : सुरेश धसांनी नाव घेतलं, प्राजक्ता माळी संतापली; घेतला मोठा निर्णय )
सुरेश धस पुढे म्हणाले, "तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे? त्यावर टीका झाली. राजू शेट्टीही इथे येऊन गेले. त्यांनीही टीका केली. धनंजय मुंडेंना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य राहिलेलं नाही."
सुरेश धस प्राजक्ता माळीबद्दल नेमकं काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत आणि राजकारणाबाबत सुरेश धस यांना विचारले असता, धनुभाऊंकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले? काय ते सांस्कृतिक कार्यक्रम..! रश्मिका मंदाना, लै कंबर हलवते ती सपना चौधरी, अलीकडे प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे. ज्यांना कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे, येथून शिक्षण घ्यावे आणि देशभरात जाऊन त्याचा प्रचार प्रसार करावा, अशी उपहासात्मक टीका सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर केली.
