TRENDING:

15 वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार सुष्मिता सेन? अभिनेत्रीनं सांगितला वेडिंग प्लॅन

Last Updated:

ब्रेकअपनंतरही रोहमन अनेकदा सुष्मिता सोबत दिसला आहे. त्यामुळं आता दोघांचही पॅचअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता सुष्मिताने तिच्या लग्नाविषयी मोठी अपडेट दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीच्या करिअरपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याचीच जास्त चर्चा झालेली आहे, हे नाव म्हणजे सुष्मिता सेन. सुष्मिता सेनचं नाव आजवर अनेक जणांशी जोडलं गेलं. पण तिने कोणासोबतच लग्नगाठ बांधली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुष्मिताचं नाव रोहमन शॉलसोबत जोडलं गेलं आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. शॉपिंग असो, इव्हेंट्स असो किंवा व्हेकेशन, दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. हे दोघेही लग्न करतील असंच सगळ्यांना वाटत होतं. पण नंतर सुष्मिताने दोघांचही ब्रेकअप झाल्याची घोषणा केली. पण त्यानंतरही दोघे अनेकदा सोबत दिसले. रोहमन अनेकदा सुष्मिता सोबत दिसला आहे. त्यामुळं आता दोघांचही पॅचअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता सुष्मिताने तिच्या लग्नाविषयी मोठी अपडेट दिली आहे.
सुष्मिता सेन
सुष्मिता सेन
advertisement

सध्या सुष्मिता आर्या 3 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सीरिजमध्ये ती पुन्हा एकदा ऍक्शन अवतारात झळकणार आहे. आता याचदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मितानं लग्नाविषयी भाष्य केलं आहे. सुष्मिताला यावेळी तिनं आता सेटल होण्याचा काही विचार केला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच नवऱ्याला कॅन्सरचं निदान; तरीही असं केलं सेलिब्रेशन; मराठी अभिनेत्रीचा खुलासा

advertisement

सुष्मिता सेन आपल्यापेक्षा 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत लग्न करणार का? याचं उत्तर देताना ती म्हणाली, ''मला माहित आहे की मी लग्न करावं असं सगळ्यांनाच वाटतं. वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर मी आयुष्यात सेटल झालं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल. पण मला याकडं लक्ष द्यायचं नाही. मला विवाह संस्थेबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. पण मी लग्न करणार नाही.''

advertisement

सुष्मिता पुढे म्हणाली, ''माझा सहवास आणि मैत्रीवर जास्त विश्वास आहे. या गोष्टी असतील तरच लग्न टिकू शकतं. पण तो आदर आणि मैत्री खूप महत्त्वाची आहे आणि स्वातंत्र्यही खूप महत्त्वाचं आहे. मला माझं स्वातंत्र्य अधिक प्रिय आहे.'' असा खुलासा तिने केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

सुष्मिता सेननं 2018 मध्ये रोहमन शॉलसोबतच्या प्रेमाची कबुली दिली. लॉकडाऊनमध्ये दोघेही एकत्र राहत होते, रोहमन सुष्मिताच्या मुलींचीही चांगली काळजी घ्यायचा. पण 2021 मध्ये दोघांचं ब्रेकअप झाले. त्यानंतर सुष्मिताने पुन्हा एकदा उद्योगपती ललित मोदीला डेट केल्याची चर्चा झाली. पण ब्रेकअपनंतर सुष्मिता आणि रोहमनचे पॅचअप झालं आहे. दोघेही अनेक इव्हेंट्समध्ये सोबत दिसतात.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
15 वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार सुष्मिता सेन? अभिनेत्रीनं सांगितला वेडिंग प्लॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल