लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच नवऱ्याला कॅन्सरचं निदान; तरीही असं केलं सेलिब्रेशन; मराठी अभिनेत्रीचा खुलासा

Last Updated:
मराठी सोबतच हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. अभिज्ञा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील चर्चेत असते. अभिज्ञानं मेहुल पै सोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. आता नुकतंच या दोघांनी त्या कठीण काळाविषयी खुलासा केला आहे.
1/8
अभिज्ञानं मेहुल पै सोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. आता नुकतंच या दोघांनी त्या कठीण काळाविषयी खुलासा केला आहे.

advertisement
2/8
मेहुल आणि अभिज्ञानं धुमधडाक्यात लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही दिवसातच मेहुलला कॅन्सरचं निदान झालं. नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलखतीत मेहुल आणि अभिज्ञानं याविषयी खुलासा केला आहे.

3/8
अभिज्ञा आणि मेहुलला या मुलाखतीत त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस कसा साजरा झाला? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर अभिज्ञानं एक धक्कादायक खुलासा केला.

4/8
अभिज्ञा म्हणाली, 'पहिल्या वाढदिवशीच आम्हाला समजलं की त्याला कॅन्सर आहे. पण मी तो दिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा ठरवलं. कारण तो दिवस कायम लक्षात राहावा असं माझ्या मनात होतं. त्यानंतर आम्ही ताज हॉटेल बुक केलं आणि दोन दिवस तिथं राहिलो.'

5/8
ती पुढे म्हणाली, 'ती परिस्थिती फार वेगळी होती. मेहुलची सर्जरी झाली असल्याने आम्हाला कुठेही बाहेर जाता आलं नाही. अगदी आम्ही कर्जत वगैरेला सुद्धा जाऊ शकलो नाही. कारण, त्याच्या पोटाला 35 टाके होते. खाण्या-पिण्याची अनेक बंधनं होती. त्यामुळे त्यातल्या त्यात आम्ही ताजमध्ये मजा केली.''

6/8
'सर्जरी होण्याआधीच आम्ही दोघांनी ठरवलं होतं की ताजमध्ये जायचंय,  आम्ही डॉक्टरांची रितसर परवानगी काढून बाहेर गेलो होतो. ताजमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा हे आधीपासून स्वप्न होतं. फक्त सर्जरी वगैरे होईल याची कल्पना नव्हती. डॉक्टरांनी देखील आम्हाला परवानगी दिली. जेवणाचं थोडंफार पथ्य होतं. पण,आम्ही दोघांनी ते मॅनेज केलं.' असा खुलासा दोघांनी केला आहे.

7/8
तसेच लग्नाच्या वाढदिवसाविषयी बोलताना मेहुल म्हणाला, 'लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला रिपोर्ट हातात आले आणि मला कॅन्सरविषयी समजलं. पण मी ते सगळं लपवून ठेवलं. पण रात्री अभिज्ञानं ते रिपोर्ट शोधून काढले आणि रात्रीच ते वाचून ती रडायला लागली.' असं मेहुल म्हणाला.

8/8
पण दोघांनीही त्यानंतर या आजाराला लढा दिला. आज दोघेही सुखी संसार करत आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement