करीनाच्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम
करीना कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तिचा पती आणि अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या घटनेनंतर करीना मीडियापासून दूर असल्याचं पाहायला मिळालं. पण आता तिने शेअर केलेल्या पोस्टमुळे नवीन चर्चांना उधाण आलं आहे. करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, "लग्न, घटस्फोट, चिंता, बाळंतपण, प्रिय व्यक्तीचा मृत्यू आणि पालकत्व – या गोष्टी तुमच्यासोबत घडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या कधीच समजणार नाहीत. जीवनात काहीच गृहीत धरू नका, कारण अनुभवच तुम्हाला खऱ्या जगण्याची शिकवण देतो."
advertisement
या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. काहींनी तिला घटस्फोटाचा इशारा तर दिला आहे, तर काहींनी ही पोस्ट सैफवर झालेल्या हल्ल्यानंतरच्या तिच्या भावनांची अभिव्यक्ती असल्याचं म्हटलं आहे.
घटस्फोटाच्या चर्चा खरी की अफवा?
करीना आणि सैफ यांचा प्रेमविवाह २०१२ मध्ये झाला होता आणि ते दोघे दोन मुलांचे पालक आहेत - तैमूर आणि जेह. त्यांचं नातं नेहमीच बॉलिवूडमध्ये आदर्श मानलं गेलं आहे. त्यामुळे या घटस्फोटाच्या चर्चांनी चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे.
मात्र, करीनाच्या या पोस्टचा खरंच सैफसोबतच्या नात्यावर काही परिणाम आहे का? की ही केवळ तिच्या जीवनात घडलेल्या अलीकडील घटनांमुळे आलेली भावना आहे? याचा खुलासा अजून झालेला नाही. तरीही, सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा झाला असून चाहते सैफ आणि करीनाच्या अधिकृत प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत.
करीनाची पोस्ट फक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित आहे की ती संपूर्ण समाजासाठी एक संदेश आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. पण तिच्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे आणि या चर्चांना कोणताही आधार आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
