रहमान नक्की काय म्हणाले होते?
हा सगळा राडा सुरू झाला रहमान यांच्या बीबीसीला दिलेल्या मुलाखतीनंतर. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, साऊथचे असूनही तुम्हाला हिंदीत कधी भेदभावाचा सामना करावा लागला का? त्यावर रहमान म्हणाले होते, "मला भाषेवरून कधीच भेदभाव जाणवला नाही. पण गेल्या ७-८ वर्षांपासून मला मिळणाऱ्या कामात प्रचंड घट झाली आहे. कदाचित इंडस्ट्रीची सूत्रे आता अशा लोकांच्या हातात गेली आहेत जे फारसे क्रिएटिव्ह नाहीत किंवा मग जातीयवादाच्या छुप्या राजकारणामुळे हे घडत असावे." यावर "जर बॉलिवूडमध्ये खरोखरच भेदभाव असता, तर या देशात एकही मुसलमान सुपरस्टार झाला नसता," अशा शब्दांत दरबार यांनी रहमान यांना आरसा दाखवला आहे.
advertisement
रहमान यांच्या वक्तव्यावर दरबार यांचे सडेतोड उत्तर
'देवदास'सारख्या अजरामर चित्रपटाचे संगीतकार इस्माईल दरबार यांनी एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांच्या दाव्याचा पूर्णपणे उडाला लावून दिला. ते म्हणाले, "जर ही इंडस्ट्री जातीयवादी असती, तर नौशाद, दिलीप कुमार किंवा माझ्यासारखे कलाकार कधीच मोठे झाले नसते. बॉलिवूडमध्ये तुमचे नशीब आणि तुमची प्रतिभा चालते, तुमचा धर्म नाही. रहमान साहेब, देवाने तुम्हाला आजवर जे दिले आहे त्यात तुमचे पोट भरत नाही का? सगळे काही मिळालं असताना अशी विधाने करणे शोभत नाही."
इस्माईल दरबार इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी रहमान यांच्या कामावरही मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, "तुम्ही खूप प्रतिभावान आहात, तुम्ही साऊंड डिझाइन उत्तम करता. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, तुम्ही चांगले गाणी गात नाही, तुम्ही फक्त एक चांगले साऊंड इंजिनिअर आहात. जे देवाने दिले आहे त्यात सुखाने जगा." दरबार यांच्या या विधानामुळे संगीत क्षेत्रात आता नव्या चर्चेला उधाण आले आहे.
बॉलिवूडमध्ये नाराजीचा सूर
ए.आर. रहमान यांनी 'छावा' चित्रपटाच्या वेळीही अशाच प्रकारचे संकेत दिले होते. मात्र, इस्माईल दरबार यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी या विधानाला नाकारले आहे. बॉलिवूड हे नेहमीच प्रतिभेचा सन्मान करणारे क्षेत्र राहिले आहे, तिथे धर्माला थारा नाही, असा सूर उमटत आहे.
