किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काही राजकीय आणि सामाजिक गटांवर टीकेचा बाण सोडला आहे. त्यांनी थेट विचारलंय की, “जेव्हा आम्हा हिंदूंचे आराध्य राजे छत्रपती शिवरायांना अर्वाच्य शिवीगाळ करणार्या आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांचं चारित्र्यहनन करणार्या कोरटकरला विशेष सुरक्षा पुरवली, तेव्हा तोंडातून ब्र सुद्धा न काढणार्या बांडगुळांना आज आमच्या हिंदू धर्माचा पुळका आलाय.” त्यांनी अलीकडेच सराटीतील आंदोलन करणाऱ्या महिलांवर झालेल्या लाठीचार्जाचाही उल्लेख केला आणि त्या वेळी गप्प बसलेल्या नेत्यांना आज हिंदुत्वाच्या नावावर ओरड करताना खडेबोल सुनावले.
advertisement
'माझी बायको फेमस, मी तर फक्त...', माधुरीसोबतच्या तुलनेमुळे डॉक्टर नेने दुःखी? हरवली स्वतःची ओळख
“दाल में कुछ काला है,” किरण मानेंचा थेट टोला
त्यांनी म्हटलंय की, आज जर कोणी मुस्लिम समुदायाविरुद्ध द्वेष पसरवत असेल, तर त्यामागे काही काळं कारस्थान असल्याची शक्यता नाकारता येत नाही. “दाल में कुछ काला है,” असा थेट टोला त्यांनी लगावला आहे. याशिवाय त्यांनी देशातील सर्वधर्मीय नागरिकांना एकत्र येण्याचं आवाहन करत म्हटलं की, “ज्यावेळी काही तथाकथित हिंदुत्ववादी गप्प होते, तेव्हा मुस्लिम बांधव आमच्या पाठीशी उभे होते.”
हल्ल्याच्या मागे कोणतं षड्यंत्र याचा तपास व्हावा
'आम्हा हिंदूंवर झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेधच आहे. पण तो नक्की कुणी केलाय? हे समोर येईपर्यन्त आम्ही विश्वास ठेवणार नाही. ते समोर आल्यावर त्यामागचे सूत्रधार कोण होते? त्यांना मिल्ट्री आणि बीएसएफची सुरक्षा भेदून आत यायला कुणी मदत केली? हे सगळे कळाल्याशिवाय आम्ही उगाचंच उठसूट कुठल्याही धर्माला दोष देणार नाही. हा शोध घेणार्या सरकारी यंत्रणेसोबत आम्ही हिंदू बहुजन आणि सर्वधर्मीय देशबांधव भक्कमपणे एकजुटीनं उभे आहोत.' असंही ते म्हणाले.
शेवटी, “एका बाईच्या नादी लागून कुरुलकर नांवाच्या देशद्रोह्यानं आपल्या सुरक्षाव्यवस्थेतली गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवलेल्याला पाठीशी घालणाऱ्या वृत्तीसारखी प्रवृत्ती या हल्ल्याची मास्टरमाईंड असणार ! त्या अतिरेक्यांना शस्त्रास्त्रं आणि पोलीस गणवेश पुरवून, सगळा प्लॅन रचून, "तुम्ही हिंदू आहात का मुसलमान? हे विचारून माणसे मारा म्हणजे भारत देशात मुस्लीमद्वेष पसरून दुही माजेल आणि आमचा फायदा होईल." अशी सुपारी देणारा दगाबाज कोण आहे, त्याला काय फायदा झालाय, हे न्यायसंस्थेत तपासणी होऊन समोर आले पाहिजे. मग त्या दगाबाजाचा बदला कसा घ्यायचा ते संविधान, पोलीस दल आणि भारतीय लष्कर ठरवेल. ...पण पुलवामा हल्ल्याचा अजूनही शोध लागलेला नाही, हे सगळ्याभारतीयांच्या लक्षात आहे. भारतीय संविधान मानणारे वरवरच्या अंदाजांवर विश्वास ठेऊन धर्मद्वेष करत नाहीत. पुरावे दाखवा. बास.” अशा शब्दांत त्यांनी देशवासीयांना विचारपूर्वक कृती करण्याचं आवाहन केलं आहे.
किरण माने यांची ही भूमिका अनेकांना स्पष्ट आणि संयमित वाटते आहे, आणि समाजमाध्यमांवर ती मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. देशात अशा वेळी समजूतदार आवाज किती आवश्यक आहेत, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
