व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये काही पोलीस रस्त्यावर लोकांना थांबवून चौकशी करताना दिसतात. या क्लिपमध्ये पोलीस एका रस्त्याच्या कडेला झोपलेल्या वृद्ध व्यक्तीजवळ जातात, त्याची चादर काढून त्याला त्याची ओळख आणि तो कुठून आला याबद्दल प्रश्न विचारतात. तपासणी केल्यानंतर काहीही संशयास्पद आढळत नसल्याने ते तेथून निघून जातात. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला असून तो चित्रपटाच्या रिलीजशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झालेला नाही.
advertisement
मात्र फॅक्ट-चेकनुसार हे दावे चुकीचे असल्याचे समोर आले आहे. ‘Grok’ च्या माहितीनुसार हा व्हिडिओ अलीकडचा नसून त्याचा Dhurandhar 2 शी कोणताही संबंध नाही. हा व्हिडिओ कराची पोलिसांच्या जुन्या कारवाईदरम्यानचा असल्याचे मानले जाते, जो बहुधा लियारी परिसरातील आहे आणि मूळतः एका इन्स्टाग्राम क्रिएटरने शेअर केला होता. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ 2025 च्या मध्यापासून उपलब्ध आहेत. ज्यामध्ये नियमित तपासणी किंवा स्थानिक पोलिसांची कारवाई दिसून येते आणि त्याचा चित्रपटाच्या कथेशी किंवा गुप्तहेरांच्या भीतीशी काहीही संबंध नाही.
Dhurandhar या चित्रपटाचा पहिला भाग गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता तर दुसरा भाग 19 मार्च रोजी प्रदर्शित झाला.
अर्थात हा व्हिडिओ खरा नाही हे माहिती असून त्यावर सोशल मीडियावर चर्चा होत आहे. अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया देत कमेंट्सचा पूर आणला आहे. काहींनी विनोदाने म्हटले की व्हिडिओमध्ये दिसणारा कुणीही व्यक्ती अगदी पोलीस किंवा सामान्य नागरिक गुप्तहेर असू शकतो. तर एका युजरने असेही म्हटले की तपासणी करणारा अधिकारीच कदाचित अंडरकव्हर एजंट असू शकतो तर दुसऱ्याने सुचवले की खरा गुप्तहेर तपासणी करणाऱ्यांमध्येच लपलेला असू शकतो.
