अभिजीतने सांगितलं की तो लग्नानंतरही डेटिंग अॅप 'टिंडर' वापरत होता, त्याच्याच नावाने आणि तेही त्याच्या पत्नीच्या नकळत! हे ऐकून काहींच्या भुवया उंचावल्या असतील, पण अभिजीतचा यामागचा उद्देश काय होता, याबाबतही त्याने यावेळी स्पष्टीकरण दिलं आहे.
अभिजीतने का सुरू केलं टिंडर अकाऊंट?
तो म्हणतो, “मला नेहमी नवीन गोष्टींबद्दल उत्सुकता असते. एकदा अमेरिकेत मित्राबरोबर होतो, तेव्हा त्याने सांगितलं की टिंडर नावाचं अॅप आलंय, जे डेटिंगसाठी वापरतात. मी केवळ पाहण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी तिथं प्रोफाइल बनवलं.” अभिजीतने स्पष्ट केलं की तो कधीच कुणाला प्रत्यक्ष भेटला नाही किंवा डेट केलं नाही. तो फक्त बोलायचा, संवाद साधायचा. विशेषतः मुलींशी गप्पा मारणं त्याला रंजक वाटायचं. “दोन-तीन मुली खूप चांगल्या बोलत होत्या. पण त्यापलीकडे काही घडलं नाही,” असंही तो म्हणाला.
advertisement
'पँटमध्ये लघवी करावी लागेल' दिग्दर्शकाची अट ऐकून खूश झाली 29 वर्षीय अभिनेत्री, झटक्यात कळवला होकार
प्रोफाइलवर मॅच आल्यानंतर, काही संवाद झाले, पण त्याने कोणतीही अतिरेकी गोष्ट केली नाही, हे अभिजीत ठामपणे सांगितलं. मात्र, "माझ्या पत्नीला याबद्दल माहीत नव्हतं. आता होईल," असं म्हणताना त्याच्या आवाजात थोडीशी गंमत आणि थोडीशी काळजीही जाणवत होती.
२००७ साली केला प्रेमविवाह
अभिजीत आणि शिल्पा यांचा २००७ साली प्रेमविवाह झाला. त्यांना दोन गोंडस मुली आहेत. ‘बिग बॉस’मध्येही शिल्पा आणि मुलींनी अभिजीतला मनापासून पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा टिंडरप्रकरणाचा खुलासा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किती परिणाम करेल, हे येणारा काळच ठरवेल.