'कॉस्च्युम कटर' असलेल्या तिच्या मित्राने सगळ्यांसमोर तिचा ड्रेस फाडला. या शोमध्ये कॉमेडियन भारती सिंग, तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि गायक टोनी कक्कर यांनी हजेरी लावली होती.
advertisement
प्रियांका लाल बॉडीकॉन ड्रेसमध्ये उभी होती तर तिचा मित्र आदिल मोहम्मदन तिचा ड्रेस कातरीने कापत होता. जिचे कपडे फाडले जात होते त्या प्रियांकाचं लग्न झालं आणि तिला 15 वर्षांचा मुलगा आहे असं तिने सांगितलं आणि सगळ्यांचा भुवया उंचावल्या.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रियांकावर अनेकांनी नवऱ्याला फसवल्याचा आरोप केला आहे. तिला असं करायला लाज वाटली पाहिजे असं म्हणत तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे. सगळ्यांसमोर जिचे कपडे कट करण्यात आले ती प्रियांका हलदर आहे तरी कोण?
प्रियांका हलदर ही बंगालची असून तिचं वय 33 वर्ष आहे. प्रियांका सध्या मुंबईत राहते. फार लहान असतानाच प्रियांकाचं लग्न झालं. प्रियांकाचं शिक्षण 12वीपर्यंतच झालं आहे.
प्रियांका 18 वर्षांची असताना तिने ती आई झाली. तिला 15 वर्षांचा मुलगा आहे. प्रियांकाचा नवरा भारतीय रेल्वेत काम करत असून तो नागपूरात राहतो.
प्रियांका हलदरने क्राईम पेट्रोलच्या अनेक भागांमध्ये दिसला आहे, ALTT (पूर्वी ALTBalaji) वरील उठा पता 4 शो, आणि डीडी नॅशनलवरील शोमध्ये देखील तिने काम केलं आहे.
प्रियांकाचे इंस्टाग्रामवर 14,500 पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
