युट्यूबरच्या आत्महत्येचा संपूर्ण प्रकार हैद्राबादमध्ये घडला आहे. रिलेशनशिपच्या वादातून कोमलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोमली मूळची विशाखापट्टणमची असून ती बीएससीचे शिक्षण घेत होती. ती हैदराबादमधील मणिकोंडा येथील चित्रपुरी कॉलनीमध्ये आपल्या नातेवाईकांसोबत राहत होती.
( वेब सीरिज हिरोईनचा पार्ट-टाईम वेश्याव्यवसाय, सीरिअल अभिनेत्रींकडून चालवायची धंदा; कशी अडकली जाळ्यात? )
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, कोमलीचं निखिल रेड्डी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. निखिल रेड्डी हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तोदेखील यूट्यूबर आहे. तोही मूळचा विशाखापट्टणमचा आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी निखिलने तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळीही कोमलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र कुटुंबीयांनी वेळीच हस्तक्षेप करून तिला समजावलं होतं. अलीकडेच दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून वाद झाला होता. या वादामुळे त्यांच्यातील तणाव वाढल्याचं सांगितले जात आहे.
सोमवारी घरात एकटी असताना कोमलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तिच्या आईने रायडुर्गम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कोमलीच्या आत्महत्येची माहिती समोर आल्यानंतर तिच्या फॅन्सना खूप मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर कोमलीला श्रद्धांजली वाहिनी आहे.
गेल्या काही महिन्यात अनेक युट्यूबर्सच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. काही महिन्यांआधी एका प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं ट्रेकिंगवेळी दरीत पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.
काही दिवसांआधी प्रसिद्ध मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं. तो अनेक महिने आजारी होता. रक्तातील सफेद कावीळ झाल्याने प्रथमेशचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची आणि लहान बहिण आहेत.
