कधी पोहोचणार?
हे चारही अंतराळवीर नासाच्या क्रू-९ मोहिमेचा भाग होते. ते मंगळवारी अमेरिकेच्या वेळेनुसार संध्याकाळी ५.५७ वाजता (भारतीय वेळेनुसार बुधवार, १९ मार्च रोजी पहाटे ३.२७ वाजता) फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर समुद्रात उतरणार आहेत. नासाच्या अधिकाऱ्यांच्या मते, लँडिंगच्या वेळी हवामान अतिशय चांगले असण्याची शक्यता आहे.
अंतराळातून पृथ्वीवर परतताना...
पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याआधी अंतराळवीरांनी पुनर्प्रवेश सूट, बूट आणि हेल्मेट घातले होते. नासाच्या लाइव्ह फुटेजमध्ये ते हसताना, एकमेकांना मिठी मारताना आणि फोटो काढताना दिसले. लँडिंगपूर्वी दोन तास त्यांना कॅप्सूलमध्ये बंद करण्यात आले आणि आवश्यक चाचण्या घेण्यात आल्या.
advertisement
स्पेसमध्ये हिरो, पृथ्वीवर येताच...; सुनीता यांनी पत्करला Gravity Horrorचा धोका
आरोग्य तपासणी...
पृथ्वीवर परतल्यानंतर विल्यम्स आणि विलमोअर यांना ह्युस्टन येथील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये नेण्यात येणार आहे. येथे काही दिवस त्यांच्यावर वैद्यकीय तपासण्या करण्यात येतील. दीर्घ काळ अंतराळात राहिल्याने स्नायू कमकुवत होणे, हाडांची घनता कमी होणे आणि दृष्टीवर परिणाम होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे NASA अंतराळवीरांसाठी ४५ दिवसांचे पुनर्वसन कार्यक्रम राबवते.
कोणाला भेटण्याची उत्सुकता
अंतराळातून परत येण्याआधी विल्यम्स यांनी सांगितले होते की, त्यांना आपल्या दोन श्वांनाना आणि कुटुंबाला भेटण्याची खूप इच्छा आहे. त्यांनी मजेशीर टिप्पणी केली होती की, हे आमच्या कुटुंबासाठी रोलर कोस्टरसारखे होते, कदाचित आमच्यापेक्षा अधिक!
अंतराळप्रवासाचे आरोग्यावर परिणाम
विल्यम्स आणि विलमोअर यांनी ISS वर सहा महिन्यांहून अधिक काळ घालवला आहे. अमेरिकेत एका मोहिमेसाठी सर्वाधिक दिवस राहण्याचा विक्रम फ्रँक रुबिओ यांच्या नावावर असून, त्यांनी ३७१ दिवस अंतराळात घालवले आहेत. जागतिक विक्रम रशियन अंतराळवीर वलेरी पोल्याकोव यांच्या नावावर आहे. वलेरी यांनी सलग ४३७ दिवस अंतराळ स्थानकावर काढले होते.
अंतराळात राहिल्याने होणाऱ्या समस्या
NASA आणि Baylor College of Medicine च्या अभ्यासानुसार, अंतराळवीरांना गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे स्नायू आणि हाडे कमकुवत होणे, रक्ताभिसरण बदलणे आणि रेडिएशनचा धोका असतो. त्याशिवाय, अंतराळातील एकाकीपणाचा मानसिक परिणामही जाणवतो.
विल्यम्स यांचा फिटनेसवर भर
नासाच्या डॉक्टरांच्या मते, सुनीता विल्यम्स यांना व्यायामाची विशेष आवड आहे आणि त्या नेहमीच नियमितपेक्षा जास्त व्यायाम करतात. हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले आहे.
९ महिने अधिक राहिल्याने मोठे आव्हान
विल्यम्स आणि विलमोअर यांच्या मिशनमध्ये सुरुवातीला फक्त काही महिन्यांचा कालावधी अपेक्षित होता. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा मुक्काम ९ महिने वाढला. एका मानसशास्त्रज्ञाच्या मते, जर तुम्हाला आज कळले की तुम्ही ऑफिसमध्ये फक्त एका दिवसासाठी गेला होतात पण आता तिथे पुढचे ९ महिने राहावे लागणार आहे, तर तुम्हाला मोठा मानसिक धक्का बसेल. पण हे अंतराळवीर विलक्षण चिकाटी आणि संयम दाखवत आहेत.
धैर्य आणि जिद्द
नऊ महिने कुटुंबापासून दूर राहूनही विल्यम्स आणि विलमोअर यांनी कोणतीही तक्रार न करता आपले काम केले. त्यांची ही जिद्द आणि जुळवून घेण्याची क्षमता भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी प्रेरणादायी ठरेल.