स्पेसमध्ये हिरो, पृथ्वीवर पाऊल ठेवताच...; सुनीता विल्यम्स यांनी पत्करला Gravity Horrorचा धोका, कळकळ वाढवणारा खुलासा

Last Updated:

Sunita Williams and Butch Wilmore: नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स, बुच विल्मोर आणि रशियाचे अलेक्सांद्र गोरबुनोव लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. विल्मोर आणि विलियम्स आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेले होते.मात्र तांत्रिक अडचणींमुळे तब्बल ९ महिने अंतराळ स्थानकात अडकून पडले. आता पृथ्वीवर आल्यानंतर देखील त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

News18
News18
नवी दिल्ली : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोरबुनोव बुधवारी स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळ यानातून पृथ्वीवर परतणार आहेत.
विल्मोर आणि विल्यम्स बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून गेल्या वर्षी ५ जून रोजी केप कॅनव्हेरल येथून निघाले होते. ते दोघे आठ दिवसांच्या मोहिमेवर गेले होते. पण अंतराळ यानातून हेलियमची गळती आणि वेगात घट झाल्यामुळे ते जवळपास नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकले आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर हवेत तरंगताना पाहणे मनोरंजक असले तरी, तेथे गुरुत्वाकर्षण नसल्याचा परिणाम पृथ्वीवर परतल्यावर अंतराळवीरांवर दीर्घकाळ राहतो. त्यांना मळमळ, चक्कर येणे, बोलण्यात आणि चालण्यात अडचण यांसारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागते.
advertisement
विविध अंतराळ मोहिमांमध्ये प्रवास केलेल्या अनेक अंतराळवीरांनी पृथ्वीवर परतल्यावर चालण्यात अडचण, दृष्टी समस्या, चक्कर येणे आणि 'बेबी फीट' नावाच्या स्थितीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागल्याचे सांगितले आहे. 'बेबी फीट' म्हणजे अंतराळवीरांच्या तळव्यांच्या त्वचेचा जाड भाग निघून जातो आणि त्यांचे तळवे बाळासारखे मऊ होतात.
कोण होत्या लीलावती? ज्यांच्या नावावरून मुंबईत सुरू झाले भव्य रुग्णालय
ह्युस्टन येथील 'बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन'ने अंतराळात शरीरात होणाऱ्या बदलांविषयी सांगितले, जेव्हा अंतराळवीर पृथ्वीवर परततात, तेव्हा त्यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी लगेच जुळवून घ्यावे लागते. त्यांना उभे राहणे, त्यांची दृष्टी स्थिर करणे, चालणे आणि वळणे यात समस्या येऊ शकतात. पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांना त्यांच्या चांगल्यासाठी पृथ्वीवर परतल्यावर लगेचच एका खुर्चीवर बसवले जाते.
advertisement
अंतराळवीरांना पृथ्वीवरील जीवनाशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी अनेक आठवडे लागतात. कानातील 'वेस्टिब्युलर' अवयव मेंदूला गुरुत्वाकर्षणाची माहिती पाठवून पृथ्वीवर चालताना मानवांना त्यांचे शरीर संतुलित ठेवण्यास मदत करतो.
जपानी अंतराळ संस्था JAXA ने म्हटले आहे, अंतराळात कमी गुरुत्वाकर्षणामुळे 'वेस्टिब्युलर' अवयवांकडून मिळणाऱ्या माहितीमध्ये बदल होतो. यामुळे मेंदू गोंधळून जातो आणि 'स्पेस सिकनेस' (अंतराळात प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणारी आरोग्य समस्या) होते, असे मानले जाते. जेव्हा तुम्ही पृथ्वीवर परतता, तेव्हा तुम्हाला पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा अनुभव येतो आणि त्यामुळे कधीकधी 'ग्रॅव्हिटी सिकनेस' होते, ज्याची लक्षणे 'स्पेस सिकनेस' सारखीच असतात."
advertisement
औरंगजेबाची कबर हटवणे शक्य आहे का? घटनेनं दिले आहे संरक्षण,काय सांगतो कायदा?
पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण रक्त आणि इतर शारीरिक द्रव शरीराच्या खालच्या भागाकडे खेचते. पण अंतराळात भारहीनतेमुळे अंतराळवीरांच्या शरीरात हे द्रव शरीराच्या वरच्या भागात जमा होतात आणि त्यामुळे ते फुगलेले दिसतात.
JAXA ने सांगितले, पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांना उभे राहिल्यावर अनेकदा चक्कर येते. या स्थितीला 'ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन' म्हणतात. असे घडते कारण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण अंतराळापेक्षा जास्त मजबूत असते आणि हृदयापासून डोक्यापर्यंत रक्त पोहोचणे अधिक कठीण असते.
advertisement
गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे हाडांच्या घनतेत लक्षणीय आणि अनेकदा अपरिवर्तनीय घट होते. नासाच्या मते, जर अंतराळवीरांनी ही कमतरता भरून काढण्यासाठी काळजी घेतली नाही, तर वजन सहन करणाऱ्या हाडांची घनता अंतराळात दर महिन्याला सुमारे एक टक्का कमी होते. या समस्येवर मात करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीरांसाठी एक कठोर व्यायाम करावा लागतो.
नासाने सांगितले, शून्य गुरुत्वाकर्षणामुळे हाडे आणि स्नायूंना होणारे नुकसान टाळण्यासाठी अंतराळवीरांना 'ट्रेडमिल' किंवा स्थिर सायकल वापरून दररोज दोन तास व्यायाम करणे आवश्यक आहे. हा व्यायाम न केल्यास, अंतराळवीर अनेक महिने अंतराळात तरंगल्यानंतर पृथ्वीवर परतल्यावर चालण्यास किंवा उभे राहण्यास अक्षम होतील.
advertisement
ब्रिटिश भारत सोडताना किती सैन्य होते? भारताला किती सैनिक मिळाले आणि किती...
कॅनडाचे अंतराळवीर ख्रिस हॅडफिल्ड यांनी सांगितले की, त्यांना २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून परतल्यावर बोलताना त्रास झाला, कारण अंतराळात जीभ भारहीन झाली होती. हॅडफिल्ड म्हणाले, पृथ्वीवर परतल्यावर लगेचच मला माझे ओठ आणि जीभेचे वजन जाणवले आणि मला माझ्या बोलण्याची पद्धत बदलावी लागली. मला हे लक्षात आले नाही की मला भारहीन जिभेने बोलायची सवय झाली होती."
advertisement
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे पृथ्वीवर परतल्यावर अंतराळवीरांना संसर्ग आणि आजारांचा धोकाही जास्त असतो.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
स्पेसमध्ये हिरो, पृथ्वीवर पाऊल ठेवताच...; सुनीता विल्यम्स यांनी पत्करला Gravity Horrorचा धोका, कळकळ वाढवणारा खुलासा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement