Dombivli News : धक्कादायक! घाटकोपरमधून डोंबिवलीत आला अन्...; लॉजमधील 'त्या' दृश्याने कर्मचाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला
Last Updated:
Dombivli News : डोंबिवली स्टेशनजवळील एका लॉजमध्ये ४२ वर्षीय व्यक्तीने एक धक्कादायक कृत्य केलंल आहे. सध्या या घटनेचा पोलिस तपास सुरु आहे.
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरातील एका लॉजमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लॉजच्या खोलीतील सिलिंग फॅनला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाची नोंद विष्णूनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रात्री मुक्कामाला आला अन् सकाळी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश राधी कदम (वय 42) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा मुंबईतील घाटकोपर परिसरात वास्तव्यास होता. गुरुवारी रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास योगेश डोंबिवलीतील एका लॉजमध्ये राहण्यासाठी आला होता. त्याने रात्री जेवण करून खोलीत विश्रांती घेतली.
शुक्रवारी सकाळी बराच वेळ झाला तरी खोलीचा दरवाजा उघडला गेला नाही. यामुळे लॉज कर्मचाऱ्यांना संशय आला. दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी खोलीत योगेशचा मृतदेह सिलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली.
advertisement
विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आर्थिक अडचणी आणि कर्जबाजारीपणामुळे योगेशने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण काय याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 2:41 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli News : धक्कादायक! घाटकोपरमधून डोंबिवलीत आला अन्...; लॉजमधील 'त्या' दृश्याने कर्मचाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला








