Ajit Pawar Death : अजित पवारांच्या पायलटला हिप्नोटाईज केलं होतं? राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केला गंभीर संशय!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Amol Mitkari On Ajit Pawar Accident : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.
Amol Mitkari on Ajit Pawar plane crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आता राजकीय वर्तुळात गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघातामागे घातपाताची शक्यता वर्तवून खळबळ उडवून दिली आहे. विमानाचा पायलट सुमित कपूर याला संमोहित (Hypnotize) केले होते का, असा धक्कादायक सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला असून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे.
मिटकरी यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्हीएसआर (VSR) कंपनीवर गंभीर संशय व्यक्त केला. अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या कंपनीवर आधीच बंदी होती आणि तरीही तेच विमान २८ तारखेला प्रवासासाठी देण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डिसेंबर २०२५ मध्ये या कंपनीने आपल्या प्रत्येक पायलटचा ५० कोटी रुपयांचा विमा (Insurance) उतरवला होता, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
या घटनेत 'सुसाईड बॉम्बर'चा अँगल असावा का, अशी शंकाही त्यांनी बोलून दाखवली आहे. अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये हिप्नोटाईज करून अशा व्यक्तींचा वापर केला जातो, असा संदर्भ देत त्यांनी राजीव गांधी यांच्या हत्येचा आणि अजमल कसाबचा उल्लेख केला. पायलटने आपत्कालीन परिस्थितीत दिला जाणारा 'मेडे' (MAYDAY) कॉल का दिला नाही, असा तांत्रिक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
advertisement
VSR कंपनीने डिसेंबर 2025 च्या महिन्यात आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलट चा 50 कोटी रुपयाचा विमा उतरविल्याची विश्वसनीय सुत्रांकडून माहिती ऐकण्यात येतेय.#महाराष्ट्र_विचारतोय @ABPNews @saamTVnews @News18_marathi @ndtv @zee24taasnews pic.twitter.com/7qh4S3pEHG
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 7, 2026
advertisement
विमा कंपनीने ५० कोटींचे आमिष दाखवून पायलटला हे कृत्य करायला लावले का, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मिटकरी म्हणाले. टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच पुणे कव्हर करणे शक्य असताना पायलटने तसे का केले नाही, यावरून त्यांनी कंपनीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सर्व शंकांमुळे हा अपघात नसून एक मोठे षडयंत्र असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
advertisement
दरम्यान, सुनेत्रा वहिनी याच अजितदादांच्या खऱ्या उत्तराधिकारी आहेत. अजित पवार यांची जागा त्याच घेऊ शकतात. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत विचार करु, असं कोणी बोलत असेल तर त्याला आमचं समर्थन नाही. अजितदादांनंतर त्या जागेवर सुनेत्रा वहिनींचाच अधिकार आहे, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 2:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या पायलटला हिप्नोटाईज केलं होतं? राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केला गंभीर संशय!









