advertisement

9 दिवसांनी लागणार पहिलं सूर्यग्रहण, या दिवशी चुकूनही करू नका 'ही' काम!

Last Updated:
फेब्रुवारी महिना खगोलप्रेमी आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी लागणार आहे.
1/7
फेब्रुवारी महिना खगोलप्रेमी आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी लागणार आहे. हे एक 'कंकणाकृती' सूर्यग्रहण असेल, ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'रिंग ऑफ फायर' म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अत्यंत संवेदनशील काळ मानले जाते. विशेषतः हे ग्रहण कुंभ राशीत आणि शनीच्या प्रभावाखाली होत असल्याने, त्याचा मानवी जीवनावर सूक्ष्म पण खोल परिणाम होण्याची शक्यता आहे.

2/7
भारतीय पंचांगानुसार, हे सूर्यग्रहण फाल्गुन महिन्यातील अमावास्येला लागेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ग्रहणाची सुरुवात दुपारी 3:26 वाजता होईल, तर संध्याकाळी 7:57 वाजता हे ग्रहण संपेल. हे ग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या भागात दिसेल. भारतात हे ग्रहण थेट दिसणार नसले तरी, ज्योतिषीय दृष्टिकोनातून त्याचा प्रभाव राशीचक्रावर नक्कीच जाणवेल.

3/7
अन्न ग्रहण करणे टाळा: धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण काळात अन्नावर किरणांचा नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे ग्रहण सुरू असताना जेवण करणे किंवा पाणी पिणे टाळावे. आजारी व्यक्ती, लहान मुले आणि वृद्धांसाठी हा नियम शिथिल आहे.

4/7
नवीन कार्याची सुरुवात करू नका: सूर्यग्रहण काळात कोणतीही नवीन कामे, महत्त्वाचे करार किंवा मोठी गुंतवणूक करणे अशुभ मानले जाते. या काळात घेतलेले निर्णय भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते.

5/7
गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी: ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. तसेच सुई, कात्री किंवा चाकू यांसारख्या टोकदार वस्तूंचा वापर करू नये, अशी पूर्वापार चालत आलेली श्रद्धा आहे.

6/7
उघड्या डोळ्यांनी पाहू नका: हे वैज्ञानिक सत्य आहे की, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्याने डोळ्यांच्या दृष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ग्रहण पाहायचे असल्यास प्रमाणित सौर चष्मा किंवा विशेष उपकरणांचाच वापर करावा.

7/7
झोपणे टाळा: शास्त्रानुसार, ग्रहण काळात झोपल्याने शरीरात आळस वाढतो आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. या वेळेत नामस्मरण किंवा ध्यान करणे अधिक फलदायी मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement