advertisement

लोकलचाही प्रवास होणार सुसाट; वंदे मेट्रो लोकल ट्रेन धावणार; जाणून घ्या सोयी सुविधा

Last Updated:

Mumbai Railway : मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर वंदे मेट्रो एसी लोकल धावणार असून प्रवाशांना सुरक्षित, वेगवान आणि गारेगार प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. आधुनिक सुविधांनी सजलेली ही लोकल मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला नवे वळण देणार आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता तुम्हाला लोकल ट्रेनचा पू्र्णपणे कायापालट होणार आहे. मात्र यात नेमका कोणत्या सुविधा प्रवाशांना मिळणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
मुंबईकरांचा प्रवास हायटेक होणार
मुंबई उपनगरी रेल्वे व्यवस्थेत प्रवाशांच्या सुरक्षिततेसह आरामदायी प्रवासासाठी एक नवा प्रवास सुरू होणार आहे. धावत्या लोकलमधून पडून होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्याबरोबरच प्रवाशांना थंड, सुसज्ज आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मुंबई लोकल मार्गावर लवकरच वंदे मेट्रो एसी लोकल दाखल होणार आहे. या एसी लोकलमुळे प्रवासी वहनक्षमता वाढणार असून मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासात मोठा बदल घडणार आहे.
advertisement
प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन 18डब्यांची अत्याधुनिक एसी लोकल तयार करण्यात येणार आहेत आणि हा उपक्रम मेक इन इंडिया’ अंतर्गत राबवण्यात येत आहे. वंदे मेट्रो लोकलही ताशी130 किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम असून प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
वंदे भारतसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा
या लोकलमध्ये प्रवाशांच्या आरामाला प्राधान्य देण्यात आले असून एअर-स्प्रिंग सेकंडरी सस्पेन्शन प्रणालीमुळे प्रवास धक्केमुक्त होणार आहे. तसेच यूएसबी चार्जिंग पॉइंट्स, इन्फोटेनमेंट सुविधा, प्रवाशांना आवश्यक माहिती देणारी प्रणाली तसेच प्रत्यक्ष वेळेत मार्ग दाखवणारे नकाशे अशी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
advertisement
डब्यांची रचना सुटसुटीत पद्धतीने करण्यात आल्याने गर्दीचे योग्य व्यवस्थापन करता येणार आहे. तसेच यंत्रणा छत आणि तळभागावर बसवण्यात आल्यामुळे डब्यांमध्ये अधिक मोकळी जागा मिळणार. गादीयुक्त आसने, दिव्यांग तसेच व्हीलचेअर वापरणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र जागा देण्यात येणार असून, सर्व वंदे मेट्रो लोकल सेवेत आल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि जागतिक दर्जाचा होईल, असा विश्वास मुंबई रेल्वे विकास महामंडळाने व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
लोकलचाही प्रवास होणार सुसाट; वंदे मेट्रो लोकल ट्रेन धावणार; जाणून घ्या सोयी सुविधा
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement