advertisement

NZ vs AFG : मुजीबने सगळी ताकद लावली पण राशीद खानने केली घोडचूक! 24 तासात झाली असतील दुसरी हॅटट्रीक

Last Updated:

Mujeeb Ur Rahman Missing Hattrick : न्यूझीलंडने अवघ्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपले दोन मुख्य बॅटर्स गमावले असून फिन एलन आणि रचिन रवींद्र स्वस्तात पवेलियनमध्ये परतले आहेत.

Mujeeb Ur Rahman Missing Hattrick
Mujeeb Ur Rahman Missing Hattrick
New Zealand vs Afghanistan : चेन्नईत खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) चौथ्या मॅचमध्ये अफगाणिस्तानने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 183 धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा अफगाणिस्तानचा निर्णय सुरुवातीला फसला असे वाटत होते, कारण पॉवरप्लेमध्येच त्यांनी दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. लॉकी फर्ग्यूसनने एकाच ओव्हरमध्ये इब्राहिम जादरान आणि रहमानुल्लाह गुरबाज यांना आऊट करून किवी टीमला मोठं यश मिळवून दिलं. पण अफगाणिस्तानने देखील दुसऱ्याच ओव्हरमध्ये दोन खेळाडूं तंबूत पाठवले पण हॅटट्रीक हुकली.

दुसऱ्या ओव्हरमध्ये हुकली हॅटट्रीक

न्यूझीलंडने अवघ्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपले दोन मुख्य बॅटर्स गमावले असून फिन एलन आणि रचिन रवींद्र स्वस्तात पवेलियनमध्ये परतले आहेत. अफगाण स्पिनर मुजीब उर रहमानने एकाच ओव्हरमध्ये या दोन मोठ्या विकेट्स काढून किवी टीमचे कंबरडे मोडलं. सलग दोन बॉलवर दोन विकेट मिळाल्यानंतर मुजीबला तिसऱ्या बॉलवर देखील विकेट मिळाली असती पण राशीद खानने फिल्डिंग व्यवस्थित लावली नव्हती, असं पहायला मिळालं. नाहीतर सलग दुसऱ्या दिवशी हॅटट्रीक पहायला मिळाली असती. रचिन आणि एलन आऊट झाल्यामुळे आता मधल्या फळीवर  प्रेशर निर्माण झाले आहे.
advertisement
advertisement
सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत गुलबदीन नायब आणि सेदिकुल्लाह अटल यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी 50 रन्सपेक्षा जास्त रन्सची शानदार पार्टनरशिप केली आणि टीमचा स्कोअर 17 ओव्हरमध्ये 150 च्या पार नेला. गुलबदीनने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि तो आऊट झाला, त्यानंतर न्यूझीलंडच्या बॉलर्सनी थोड्या प्रमाणात कमबॅक करत अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 182 च्या स्कोअरवर रोखलं.
advertisement

न्यूझीलंडची खराब सुरुवात 

दरम्यान, न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्यूसनने भेदक मारा करत 2 खेळाडूंना आऊट केले, तर मॅट हेनरी आणि डफीने त्याला चांगली साथ दिली. 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. अफगाणिस्तानच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचे टॉप ऑर्डरचे बॅटर्स पूर्णपणे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे सुरुवातीलाच मॅचवर अफगाणिस्तानने पकड मिळवली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
NZ vs AFG : मुजीबने सगळी ताकद लावली पण राशीद खानने केली घोडचूक! 24 तासात झाली असतील दुसरी हॅटट्रीक
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement