TRENDING:

कोणत्या राज्यात सर्वाधिक वक्फ मालमत्ता? हे शहर म्हणजे ‘भारताची वक्फ राजधानी’; मुंबईत सर्वाधिक मूल्यवान जागा

Last Updated:

Most Waqf Properties: नरेंद्र मोदी सरकारने वक्फ नियमांमधील सुधारणा करणारे विधेयक मंजूर केले आहे. तेलंगणा वक्फ मंडळ सर्वात श्रीमंत असून, हैदराबादमध्ये सर्वाधिक वक्फ मालमत्ता आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारने लोकसभेत आणि राज्यसभेत वक्फ नियमांमधील सुधारणा करणारे विधेयक सादर करून मंजूर केले आहे. वक्फ ही एक अशासकीय संस्था असून तिच्याकडे भारतात सर्वाधिक जमीन आणि मालमत्ता आहे.
News18
News18
advertisement

सर्वाधिक वक्फ मालमत्ता असलेल्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये हैदराबादचा क्रमांक अव्वल आहे. ‘भारताची वक्फ राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात सुमारे 77,000 वक्फ मालमत्ता आहेत. जे देशातील एकूण वक्फ मालमत्तेच्या 30% आहे.

वक्फ बोर्डाला सर्वाधिक जमीन कोणी दान केली? यादी वाचून तुम्ही थक्क व्हाल

या महत्त्वाच्या मालमत्तांमध्ये 400 वर्ष जुन्या मक्का मशिदीचा समावेश आहे. चार मिनारच्या आसपास असलेल्या व्यावसायिक दुकानांमधून वार्षिक कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. याशिवाय डेक्कन प्रदेशातील निजामांनी दान केलेली हजारो एकर जमीन देखील वक्फच्या मालकीची आहे.

advertisement

भारतातील सर्वात श्रीमंत वक्फ मंडळ

तेलंगणाचे वक्फ मंडळ हे देशातील सर्वात श्रीमंत वक्फ मंडळ आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मिळून 1.2 लाख वक्फ मालमत्ता आहेत. आंध्र प्रदेशातील उल्लेखनीय मालमत्तांमध्ये कुर्नूलमधील 200 वर्ष जुनी शाही मशीद आणि कडप्पा व अनंतपूरमधील लागवडी योग्य जमिनींचा समावेश आहे.

तेलंगणा वक्फ मंडळाचे वार्षिक उत्पन्न 500 कोटी रुपये आहे. जे भाडे आणि देणग्यांच्या माध्यमातून मिळते. तर आंध्र प्रदेशातील 85% वक्फ जमिनी ग्रामीण भागात आहेत.

advertisement

सर्वाधिक वक्फ मालमत्ता असलेले राज्य

वक्फ मालमत्तेच्या संख्येनुसार उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. येथे 1.5 लाख मालमत्ता आहेत. जे देशातील एकूण मालमत्तेच्या 20% पेक्षा जास्त आहे. तथापि एकूण मालमत्तेच्या मूल्यांकनाच्या बाबतीत या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. लखनऊमधील बडा इमामबाडा आणि मशिदीची जमीन तसेच कानपूर, मेरठ आणि मुरादाबादजवळची औद्योगिक जमीन आणि धार्मिक स्थळे येथील प्रमुख मालमत्ता आहेत.

advertisement

कर्नाटकमध्ये बेंगळूरु, गुलबर्गा आणि बिदर येथे 30,000 हून अधिक वक्फ मालमत्ता आहेत. 2023 च्या एका अहवालानुसार, बेंगळूरुमधील 90% वक्फ जमिनीवर बेकायदेशीर कब्जा आहे. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि मुर्शिदाबादमधील ऐतिहासिक मशिदी आणि कबरी, तसेच हुगळी नदीच्या काठावरील व्यावसायिक जमिनी या महत्त्वाच्या मालमत्ता आहेत.

सर्वाधिक वक्फ मालमत्ता असलेली पाच राज्ये म्हणजे उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल.

advertisement

सर्वाधिक मूल्यवान वक्फ मालमत्ता असलेली शहरे:

हैदराबाद (तेलंगणा): येथील मक्का मशीद संकुलाचे मूल्य 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि चार मिनारच्या आसपासच्या दुकानांमधून वार्षिक 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त भाडे मिळते.

दिल्ली: येथील जामा मशीद आणि आसपासच्या जमिनीचे मूल्य 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ज्यात निजामुद्दीन दर्गा परिसरातील हॉटेल्स आणि दुकानांचा समावेश आहे.

अजमेर (राजस्थान): येथील अजमेर शरीफ दर्ग्याला वार्षिक 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळतात.

मुंबई (महाराष्ट्र): येथील हाजी अली दर्गा समुद्रकिनाऱ्याजवळच्या अत्यंत मोक्याच्या जमिनीवर स्थित आहे.

वक्फ मालमत्तेबद्दल...

-देशातील सर्वात श्रीमंत तेलंगणा वक्फ मंडळाकडे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता आहे.

-उत्तर प्रदेशातील 40% वक्फ जमीन लागवडीयोग्य आहे. ज्यामुळे मंडळाला मोठे उत्पन्न मिळते.

-केरळमधील वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन सर्वात पारदर्शक मानले जाते आणि सरकारी नोंदींमध्ये नमूद केलेल्या मूल्यापेक्षा 75% वक्फ मालमत्तेचे प्रत्यक्ष मूल्य जास्त आहे.

-केंद्र सरकारने वक्फ नियमांमधील सुधारणांसाठी उचललेले हे पाऊल वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात अधिक सुधारणा आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने उचलले गेले आहे.

मराठी बातम्या/Explainer/
कोणत्या राज्यात सर्वाधिक वक्फ मालमत्ता? हे शहर म्हणजे ‘भारताची वक्फ राजधानी’; मुंबईत सर्वाधिक मूल्यवान जागा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल