ट्युशनला जाताना घडला भयंकर प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 6 फेब्रुवारी रोजी घडली. पीडित मुलगी नेहमीप्रमाणे ट्युशनला जात होती. त्याचवेळी आरोपी रिक्षाचालकाने तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन हा प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा मागोवा
पोलिसांनी तातडीने परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये आरोपीची रिक्षा आणि त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अंबरनाथमधून त्याला बेड्या ठोकल्या.
advertisement
आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. बदलापूरमध्ये यापूर्वीही शाळेतील मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने येथील नागरिकांमध्ये आधीच संतापाचे वातावरण आहे. त्यातच ट्युशनला जाणाऱ्या सुरक्षित मुलीवर अशा प्रकारे अत्याचार झाल्याने पालकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
