TRENDING:

'तुम्हीच आम्हाला बोलावता!' डोंबिवलीतील परप्रांतीय कामगाराची मुजोरी; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Last Updated:

सार्वजनिक शौचालयात सुट्या पैशांच्या किरकोळ वादातून या कामगाराने थेट "मी मराठी शिकणार नाही" अशी मुजोरी केली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: डोंबिवली शहरात एका परप्रांतीय कामगाराने मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा अवमान केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एका सार्वजनिक शौचालयात सुट्या पैशांच्या किरकोळ वादातून या कामगाराने थेट "मी मराठी शिकणार नाही" अशी मुजोरी केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसेने आपल्या स्टाईलने या कामगाराला धडा शिकवला आहे.
News18
News18
advertisement

सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत एका परप्रांतीय कामगाराने मराठी माणसाशी अरेरावी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. "मै मराठी नही सिखुंगा, हमारे बिहार मे काम की कमी नही है, तुम लोग हमे बुलाते हो," अशा शब्दांत या कामगाराने महाराष्ट्राचा अपमान केला. मात्र, ही मुजोरी फार काळ टिकली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा जाब विचारताच काही वेळातच या मुजोर कामगाराने आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे.

advertisement

नेमका वाद काय?

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एका सार्वजनिक शौचालयात एक मराठी व्यक्ती गेली होती. लघुशंकेसाठी जाताना संबंधित व्यक्तीकडे सुट्टे पैसे नव्हते. त्यांनी तिथल्या कामगाराला माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत, मी ऑनलाईन पैसे देतो, असे विनंतीपूर्वक सांगितले. मात्र, या साध्या विषयावरून तो कामगार संतापला आणि त्या व्यक्तीशी हुज्जत घालू लागला. जेव्हा त्या मराठी व्यक्तीने महाराष्ट्रात राहतोस तर मराठीत बोल, असे सांगितले, तेव्हा तो कामगार प्रचंड संतापला.

advertisement

संबंधित कामगाराने मुजोरी दाखवत म्हटले की, मला मराठी शिकण्याची गरज नाही. आमच्या बिहारमध्ये कामाची कमी नाही, तुम्ही लोकच आम्हाला इथे कामाला बोलावता. मराठी माणसाच्या अस्मितेवर घाला घालणारे हे विधान ऐकून उपस्थित व्यक्तीने तत्काळ मनसे पदाधिकाऱ्यांना घडलेला प्रसंग सांगितला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या कामगाराला मनसे 'स्टाईल'ने इंगा दाखवल्यानंतर कर्मचारी सुतासारखा सरळ धाला आणि त्याची भाषाच बदलली.

advertisement

[video width="478" height="850" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/Dombivli-Video-2026-03-b9cafd76b624fe18cf2edf2af9b23f7d.mp4"][/video]

व्हिडीओ व्हायरल मग मागितली माफी

या संपूर्ण वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. मनसेचा दणका मिळताच तोच मुजोर कामगार नरमला आणि त्याने हात जोडून मराठी जनतेची माफी मागितली. पुन्हा अशी चूक होणार नाही आणि मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करेन, अशी कबुली त्याने दिली आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आता पेरणीचं काम होणार सोपे, सोलापुरातील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र, किंमत किती? Video
सर्व पहा

Shawarma Stall : डोंबिवलीची शोरमा गर्ल हरली नाही तर लढली; अखेर महिन्यानंतर मिळाला स्टॉल

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
'तुम्हीच आम्हाला बोलावता!' डोंबिवलीतील परप्रांतीय कामगाराची मुजोरी; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल