TRENDING:

आता पेरणीचं काम होणार सोपे, सोलापुरातील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र, किंमत किती? Video

Last Updated:

रणजीत निंबाळकर यांनी शेतकरी बांधवांसाठी मानव, ट्रॅक्टर तसेच पावर टिलर चलित पेरणी यंत्र तयार केले आहे. या यंत्राद्वारे टोकन पद्धतीने शेतामध्ये बियांची अचूक पेरणी करता येते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणाऱ्या रणजीत निंबाळकर यांनी शेतकरी बांधवांसाठी मानव, ट्रॅक्टर तसेच पावर टिलर चलित पेरणी यंत्र तयार केले आहे. या यंत्राद्वारे टोकन पद्धतीने शेतामध्ये बियांची अचूक पेरणी करता येते. या यंत्राबाबत अधिक माहिती रणजीत निंबाळकर यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement

सध्या शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून शेती अवजारांमध्येही मोठे बदल होत आहेत. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच समस्येचा विचार करून करमाळा तालुक्यातील रणजीत निंबाळकर यांनी हरिहर ऍग्रो रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करून मानव, ट्रॅक्टर आणि पावर टिलर चलित पेरणी यंत्र विकसित केले आहे.

advertisement

या यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हींची बचत होणार आहे. तसेच पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर चार इंचांपासून ते आवश्यकतेनुसार वाढवता किंवा कमी करता येते, ही या यंत्राची विशेष बाब आहे.

भारतामधील बहुतांश पेरणी यंत्रांमध्ये काही प्रमाणात बियाणे शिल्लक ठेवावे लागते. मात्र या नव्या यंत्रामध्ये बियाणे शिल्लक राहत नाही आणि संपूर्ण बियाण्याची अचूक पेरणी होते. या पेरणी यंत्राद्वारे कांदा, मेथी, कोथिंबीर, मका, सोयाबीन, कापूस, गाजर, तूर, भुईमूग यांसारख्या विविध पिकांची पेरणी करता येते. या यंत्राला बनवण्यासाठी 15 हजार खर्च आला आहे. तर याची किंमत 25 हजार रुपये आहे. 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आता पेरणीचं काम होणार सोपे, सोलापुरातील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र, किंमत किती? Video
सर्व पहा

परिणामी, महागडी बियाणे कमी प्रमाणात लागतात आणि शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. वेळेची बचत होत असल्याने शेतीतील कामे अधिक वेगाने आणि अचूकपणे पूर्ण करणे शक्य होत आहे. त्यामुळे हे पेरणी यंत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच या यंत्राला शासकीय अनुदान देखील उपलब्ध असल्याची माहिती रणजीत निंबाळकर यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
आता पेरणीचं काम होणार सोपे, सोलापुरातील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र, किंमत किती? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल