नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण ऑक्टोबर 2019 सालातलं आहे. 2019 साली त्या अल्पवयीन मुलीच्या आईचे निधन झाले, तेव्हा ती 15 वर्षांची होती. आईच्या निधनानंतर ही अल्पवयीन मुलगी तिच्या आईच्या नातेवाईकांकडे निघून गेली. इकडे त्या मुलीच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्या मुलीच्या वडिलांनी मुलीला पुन्हा आपल्या घरी आणलं. तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. जर याची वाच्यता कुठेही केली तर ठार मारून टाकेल, अशी धमकी सुद्धा नराधम बापाने लेकीला दिली.
advertisement
आरोपीची शिक्षा
वडिलांनी दिलेली धमकी ऐकून अल्पवयीन मुलगी घाबरली होती. पण तिने भितीपोटी घडलेला सर्व प्रकार मावशी आणि काकांना सांगितला. घटनेबद्दल कळताच अल्पवयीन मुलीच्या मावशी आणि काकांनी मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. तेव्हापासून ते 2026 पर्यंत हे प्रकरण न्याय प्रविष्ठ होतं. तर या प्रकरणी आता पोलिसांनी निकाल दिला आहे. कल्याणच्या विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी आरोपीला 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे. शिवाय 10 हजाराचा दंड ठोठावलाय. दंड न भरल्यास वर्षभरासाठी साधी कैद भोगावी लागणार आहे.
जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष पॉक्सो न्यायालयामध्ये सरकारी वकील आश्विनी भामरे- पाटील आणि आर. आर. भोईर या दोन्हीही वकिलांनी आपआपली बाजू मांडली. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी नराधम बापावर एकत्रित 20 वर्षे शिक्षेत अन्य दोन कलमांतर्गत प्रत्येकी तीन वर्षांचा कारावास आणि पाच हजार दंडाची शिक्षा सुनावलीये. दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे. इतर दोन कलमांतर्गत प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी पाच आणि तीन हजारांचा दंड आकारला जाईल. दंड न भरल्यास प्रत्येकी सहा आणि तीन महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे.
