advertisement

Success Story : नोकरी सोडली, फक्त 3 हजारांत सुरू केला दागिन्यांचा व्यवसाय, आता सिद्धीची लाखांत कमाई, Video

Last Updated:

एक वेगळी वाट निवडणारी तरुणी म्हणजे सिद्धी चोरगे. शिक्षण, नोकरी आणि स्वतःची आवड या सगळ्यांचा समतोल साधत तिने हळूहळू स्वतःचा व्यवसाय उभा केला.

+
MBA

MBA पूर्ण करूनही नोकरी नको; २ ते ३ हजारांत सुरू केला दागिन्यांचा व्यवसाय आज मराठी सेलिब्रिटींचा आवडता ब्रँड

मुंबई : आजकाल अनेक तरुण-तरुणी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीचा मार्ग निवडतात, पण काही जण आपल्या आवडीला प्राधान्य देत वेगळा मार्ग निवडतात आणि त्यातच आपली ओळख निर्माण करतात. अशीच एक वेगळी वाट निवडणारी तरुणी म्हणजे सिद्धी चोरगे. शिक्षण, नोकरी आणि स्वतःची आवड या सगळ्यांचा समतोल साधत तिने हळूहळू स्वतःचा व्यवसाय उभा केला.
सिद्धीने एमबीए पूर्ण केल्यानंतर एचआर अॅडमिनिस्ट्रेशन क्षेत्रात काही वर्षे काम केले. तिच्याकडे एक स्टेबल पगाराची नोकरी होती, पण लहानपणापासूनच तिला कलेची आवड होती. विशेषतः दागिने बनवणे, डिझाईन तयार करणे हे तिला खूप आवडायचं. नोकरीसोबतच तिने आपल्या या आवडीवर काम सुरू ठेवलं. लॉकडाऊननंतर 2023 मध्ये तिने पुण्यात ज्वेलरी मेकिंगचा एक छोटासा कोर्स केला. त्यानंतर आणखी काही कोर्सेस करून तिने आपलं कौशल्य वाढवलं. हळूहळू ती स्वतःच वेगवेगळे दागिने बनवू लागली.
advertisement
सुरुवातीला फक्त 2 ते 3 हजार रुपयांत साहित्य घेऊन तिने काम सुरू केलं. नोकरी करत असतानाच ती छोटे छोटे दागिने तयार करून विकू लागली. तिच्या डिझाईन्स लोकांना आवडू लागल्या आणि तिला चांगला प्रतिसाद मिळू लागला. यानंतर तिने प्रदर्शनांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तिच्या ज्वेलरीची खासियत म्हणजे पारंपरिक महाराष्ट्रीयन डिझाईन्ससोबत वेगळेपणा. त्यामुळे तिच्या उत्पादनांना बाजारात वेगळी ओळख मिळाली.
advertisement
हळूहळू ऑर्डर्स वाढू लागल्या, सोशल मीडियावरून तिचं काम अधिक लोकांपर्यंत पोहोचलं. मराठी कलाकार आणि मालिकांमधील अभिनेत्री सुद्धा तिच्याकडून खास डिझाईन्स करून घेऊ लागल्या. काही मालिकांसाठी ज्वेलरी तयार करण्याची संधीही तिला मिळाली. चांगला प्रतिसाद पाहून तिने पुढे पूर्णवेळ व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला छोट्या गुंतवणुकीत सुरू झालेला हा प्रवास आज मोठा झाला आहे. सध्या ती वर्षाला सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांची कमाई या व्यवसायातून करते.
advertisement
सिद्धीने घेतलेला निर्णय, तिचं सातत्य आणि स्वतःच्या आवडीवर केलेलं काम यामुळे आज तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरी सोडली, फक्त 3 हजारांत सुरू केला दागिन्यांचा व्यवसाय, आता सिद्धीची लाखांत कमाई, Video
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement