हजारो वर्षे लोटली तरी उलगडलं नाही रहस्य, असं मंदिर ज्याची कडक उन्हातही गायब होते सावली!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जी त्यांच्या रहस्यांसाठी जगप्रसिद्ध आहेत. भारताला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जो भारतातील वेगळेपण दर्शवतो. भारतात असंही एक प्राचीन मंदिर आहे जे त्याच्या भव्य वास्तू आणि रेखीव कोरीवकामासाठी देखील प्रसिद्ध आहे.
advertisement
advertisement
तमिळनाडूच्या तंजावर येथील बृहदीश्वर मंदिर हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगातील एक वास्तूशिल्पीय आश्चर्य मानले जाते. 1000 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी, या मंदिराचे तंत्रज्ञान आजही आधुनिक अभियंत्यांना कोड्यात टाकते. बृहदेश्वर मंदिराला त्याच्या भव्य वास्तुकला, धार्मिक महत्त्व आणि सांस्कृतिक सौंदर्यामुळे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
advertisement
advertisement
या मंदिराबाबतचे सर्वात मोठे आणि चर्चित रहस्य म्हणजे, 'दुपारच्या वेळी या मंदिराच्या मुख्य शिखराची सावली जमिनीवर पडत नाही.' चोल राजा राजराजा प्रथम यांनी बांधलेले हे मंदिर पूर्णपणे ग्रॅनाईट दगडांनी बनलेले आहे. विशेष म्हणजे या भागात कुठेही ग्रॅनाईटचे डोंगर नसताना इतके अजस्त्र दगड येथे कसे आणले, हे एक मोठे गूढ आहे.
advertisement
दुपारी जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा या मंदिराच्या मुख्य गोपुराची सावली जमिनीवर कुठेही पडताना दिसत नाही. अनेकांच्या मते हे वास्तूरचनेचे असे कौशल्य आहे की सावली स्वतःच्याच पायाशी लुप्त होते. मात्र, विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर मंदिराचे शिखर इतके भव्य आणि विशिष्ट कोनात बांधले आहे की, त्याची सावली जमिनीवर न पडता मंदिराच्याच पायथ्याशी विरून जाते, ज्यामुळे ती 'गायब' झाल्याचा भास होतो.
advertisement









