Pune News: पुण्यात हत्याराचा धाक दाखवून दुचाकी चोरली; काही अंतर जाताच चोरट्यांसोबतच घडलं भयंकर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
चोरी केलेली दुचाकी घेऊन पळत असताना आरोपींचा पिंपरी येथे अपघात झाला होता. या अपघातात आरोपी जखमी झाले अन्..
पुणे: वडगाव शेरी परिसरात मध्यरात्री रस्त्यावरच चोरीचा थरार पाहायला मिळाला. ३ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कल्याण भापकर आणि त्यांचा मित्र वडगाव शेरी गावठाण येथील सार्वजनिक शौचालयाजवळ गेले होते. यावेळी तीन आरोपींनी त्यांना लोखंडी हत्याराचा धाक दाखवून त्यांची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. एवढेच नव्हे तर, आरोपींनी फिर्यादीच्या ओळखीच्या प्रसाद ससाणे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या दुचाकीची तोडफोड केली आणि त्याच्या घराच्या दरवाजावर हत्याराने प्रहार करून नुकसान केले. मात्र, काही अंतर जाताच चोरट्यांसोबतच भयंकर घडलं.
कल्याण भापकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चंदननगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या माहितीवरून आरोपींचा माग काढला. यावेळी ते पिंपरी परिसरात असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे, चोरी केलेली दुचाकी घेऊन पळत असताना आरोपींचा पिंपरी येथे अपघात झाला होता. या अपघातात आरोपी किरकोळ जखमी झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली.
advertisement
मध्यरात्रीच्या सुमारास दहशत माजवत दुचाकी चोरणाऱ्या या दोन अट्टल गुन्हेगारांना चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश हरीश्चंद्र पायगुडे (वय २४, रा. विश्रांतवाडी) आणि आतिष उमेश डिंगरे (वय २५, रा. धानोरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कुल्फी विक्रेते कल्याण विठ्ठल भापकर यांनी फिर्याद दिली होती.
चोरीची गाडी अन् अपघात
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यातील तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 12:54 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुण्यात हत्याराचा धाक दाखवून दुचाकी चोरली; काही अंतर जाताच चोरट्यांसोबतच घडलं भयंकर









