अजितदादा अपघात: 24 तासात खरातच्या समता बँकेत अनेक व्यवहार, दमानियांच्या नव्या आरोपाने खळबळ
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ज्या दिवशी अजित पवारांचा अपघात झाला, त्या दिवशी आणि आदल्या दिवशी म्हणजेच २७ जानेवारीला अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या समता पतसंस्थेत अनेक व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट दमानिया यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या विमानाला अपघात होऊन आता दोन महिन्याहून अधिकचा कालावधी लोटला आहे. त्यांचा अपघात नेमका कशामुळे झाला? कुणी केला? हा अपघात होता की घातपात? याचं गूढ अद्याप कायम आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे, मात्र तपासातून अजून तरी काहीच निष्पन्न झालं नाही. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समता पतसंस्थेबाबत खळबळजनक दावा केला आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या माध्यमातून अजित पवारांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा केला होता? यातूनच त्यांचा अपघात घडवून आणला? असा संशय व्यक्त केला जात होता. आता या संशयाला खतपाणी पुरवणारी माहिती दमानिया यांनी दिली आहे. कारण ज्या दिवशी अजित पवारांचा अपघात झाला, त्या दिवशी आणि आदल्या दिवशी म्हणजेच २७ जानेवारीला अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या समता पतसंस्थेत अनेक व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट दमानिया यांनी केला आहे.
advertisement
अजित पवारांचा अपघात व्हायच्या आदल्या दिवशी म्हणजेच २७ जानेवारीला समता पतसंस्थेत १७, अपघाताच्या दिवशी २८ जानेवारीला १९, त्यानंतर पुढील तीन दिवस अनुक्रमे १०, ८ आणि ८ व्यवहार झाले. या पतसंस्थेत यापूर्वी मागील वर्षभरात कधीही एवढे जास्त व्यवहार झाले नाहीत. या पतसंस्थेत प्रत्येक महिन्याला केवळा २,४, किंवा ८ असेच व्यवहार होत होते. मात्र अचानक या बँकेत व्यवहार वाढल्याचं निरीक्षण दमानिया यांनी नोंदवलं आहे.
advertisement
त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, अशोक खरात प्रकरणातील समता नावाची जी पतसंस्था आहे. ज्याची आता चौकशी सुरू आहे. त्याचे १ एप्रिल २०२५ ते १७ मार्च२०२६ या कालावधीत दरमहा कधी 1 तर कधी 7 मेसेज, तर कधी 8 मेसेज यायचे. पण २७ जानेवारी म्हणजे अजित पवारांचा अपघात झाला, त्याच्या एक दिवसआधी समता पतसंस्थेच्या व्यवहाराचे १७ मेसेज आले होते. २८ जानेवारी ज्यादिवशी अजित पवारांचा अपघात घडला, त्या दिवशी १९ मेसेज आले होते.
advertisement
अपघात्याच्या दुसऱ्या दिवशी २९ जानेवारी रोजी १० मेसेज आले होते, ३० आणि ३१ जानेवारी रोजी प्रत्येक ८ मेसेजेस आहेत. हे सगळे एका दिवसाचे मेसेज आहे. या पतसंस्थेत एवढे मेसेज महिन्याला देखील येत नव्हते, तेवढे केवळ एका दिवसांत समता पतसंस्थेकडून आले आहेत. म्हणजे काय झालं? हा सगळा तपशील मी एसआयटीकडे देऊन, यात काय झालं? याची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे, यात हे सगळे व्यवहार कुणी केले? पैशांची फिरवाफिरवी झाली का? या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत, अशी मागणी दमानिया यांनी केली. दरम्यान, सीडीआरवरून केलेल्या आरोपांवरून अंजली दमानिया ढसाढसा रडल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 12:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादा अपघात: 24 तासात खरातच्या समता बँकेत अनेक व्यवहार, दमानियांच्या नव्या आरोपाने खळबळ









