मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवायचंय पण पैसे नाहीत? सरकार देतंय स्कॉलरशिप, पात्रता काय अर्ज कुठे कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Foreign Scholarship : परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना राज्य सरकारमार्फत शिष्यवृत्ती दिली जाते.
मुंबई : परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना राज्य सरकारमार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांकडून या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जातात.
शासन निर्णय काय?
राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ४ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्याथ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतात.
अशा विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत ही शिष्यवृत्ती दिली जाते. याबाबतचे निकष उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निश्चित केले आहेत, शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया संचालनालयाच्या https://fs.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरून करण्यात येते.
advertisement
४० विद्यार्थ्यांना मिळतो लाभ
शिष्यवृत्तीचा राज्यातील खुल्या प्रवर्गातील ४० गुणवंत विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. यात पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविकेच्या ३० व पीएचडीच्या १० विद्यार्थ्यांचा समावेश असतो. क्वाक्वारील सायमंड्स रैंकिंगनुसार देशात दोनशेच्या आत असलेल्या परदेशातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.
वैद्यकीय शिक्षणासाठी अर्थसहाय्य
भारत आणि रशिया या दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीने ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.भारतीय विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील प्रवेशासाठी रशियाला पसंती दिली जाते. रशियातील विद्यापीठांत घेतलेल्या पदव्यांना युरोप, आशियासह इतर खंडांमध्येही मान्यता आहे.
advertisement
या पदव्यांचा समावेश युरोपियन परिशिष्टात झाल्याने रशियातून पदवी घेतलेले विद्यार्थी जगात कुठेही नोकऱ्या मिळवू शकतात. फर्स्ट मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी (सेचनोव्ह युनिव्हर्सिटी), पाव्हलोव्ह फर्स्ट सेंट पीटर्सबर्ग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटी ऑफ रशिया (आरयूडीएन युनिव्हर्सिटी), नॉर्थ आँसेशियन स्टेट मेडिकल अॅकॅडेमी, तेंम्बोव्ह स्टेट युनिव्हर्सिटी आदींचा समावेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 12:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवायचंय पण पैसे नाहीत? सरकार देतंय स्कॉलरशिप, पात्रता काय अर्ज कुठे कराल?








