advertisement

स्टेटस नवऱ्यानं ठेवलं अन् मार बायकोनं खाल्ला, संभाजीनगरात 2 महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, नेमकं काय घडलं?

Last Updated:

सोशल मीडियावरील एका स्टेटसमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज तालुक्यातील वडगाव कोल्हाटी परिसरात मोठा राडा झाला आहे.

News18
News18
सोशल मीडियावरील एका स्टेटसमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज तालुक्यातील वडगाव कोल्हाटी परिसरात मोठा राडा झाला आहे. पतीने एका ओळखीच्या महिलेच्या वाढदिवसानिमित्त तिचा फोटो स्टेटसला ठेवला होता. याच रागातून संबंधित महिलेने थेट विवाहितेचं घर गाठून तिच्यावर कटरने जीवघेणा हल्ला केला. या अजब घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

वडगाव कोल्हाटी येथील एका ३५ वर्षीय विवाहितेच्या पतीने ओळखीच्या एका महिलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिचा फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवला होता. सामान्यतः अशा शुभेच्छांचं स्वागत केलं जातं, परंतु या प्रकरणात मात्र उलटं झालं. स्टेटस पाहिल्यानंतर संबंधित महिला संतप्त झाली. "तुझ्या नवऱ्याने माझं वाढदिवसाचं स्टेटस का ठेवलं?" असा सवाल करत तिने शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री थेट फिर्यादी विवाहितेचं घर गाठलं.
advertisement
घरी पोहोचल्यानंतर दोन्ही महिलांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. रागाच्या भरात असलेल्या त्या महिलेनं विवाहितेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर तिने सोबत आणलेल्या कटरने विवाहितेच्या उजव्या हातावर वार करून तिला गंभीर जखमी केले. तसेच, "तुला जिवे मारून टाकीन," अशी धमकी दिली.
advertisement
या प्रकारानंतर जखमी विवाहितेने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोर महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
स्टेटस नवऱ्यानं ठेवलं अन् मार बायकोनं खाल्ला, संभाजीनगरात 2 महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, नेमकं काय घडलं?
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement