Shocking : आईने लेकीला रुग्णालयात नेलं अन् बापाचं काळं कृत्य जगासमोर आलं; बोरिवलीतील घटना
Last Updated:
mumbai shocking news : बोरिवली येथे अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. वैद्यकीय तपासणीत गरोदरपण आणि गर्भपात उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
मुंबई : मुलांना आपल्या आई-वडिलांकडूनच सर्वाधिक सुरक्षितता मिळते अशी समजूत असते. मात्र, मुंबईतील बोरिवली भागात घडलेल्या एका घटनेने सर्वांना हादरुन टाकले आहे. एका 14 वर्षांच्या मुलीवर तिच्याच वडिलांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
नराधम पित्याचा 3 महिने लेकीवर अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अवघ्या 14 वर्षांती असून ती आपल्या आईसोबत बोरिवलीत राहत होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे नराधम पिता गेल्या तीन महिन्यांपासून मुलीवर अत्याचार करत होता. सुरुवातील हा प्रकार घरातच लपवून ठेवण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी मुलीची तब्येत अचानक बिघडण्यास सुरुवात झाली.
advertisement
मुलीच्या पोटात वारंवार वेदना जाणवू लागल्याचे तिच्या आईला समजले आणि तिला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथं डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. ज्यात मुलगी गरोदर असल्याचे आणि तिचा गर्भपात झाल्याचे समोर आहे. ही गोष्ट लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने ती माहिती लगेच पोलिसांना दिली.
पोलिसांनीही कोणत्याही गोष्टीचा वेळ न घेता रुग्णालयात धाव घेतली आणि प्राथमिक चौकशी सुरु केली. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या आईचा सविस्तर जबाब नोंदवून घेण्यात आला आणि चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मुलीवर तिच्यात वडिलांनी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले.
advertisement
या धक्कादायक प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखला असून आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. अशा प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 1:09 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : आईने लेकीला रुग्णालयात नेलं अन् बापाचं काळं कृत्य जगासमोर आलं; बोरिवलीतील घटना







