TRENDING:

KDMC : केडीएमसीच्या कर्मचाऱ्याचा अजब कारनामा, तुरुंगात असतानाही पगार जमा; आहे तरी कोण?

Last Updated:

KDMC Salary Scandal: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा समोर आलेल्या एका विचित्र पण तितकाच धक्कादायक कारभारामुळे पुन्हा एकदा संपूर्ण प्रशासन हादरले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली अटक होऊन तब्बल 40 दिवस तुरुंगात असलेल्या एका कर्मचाऱ्याला महापालिकेकडून नियमित पगार दिला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती महापालिकेचा कर्मचारी आहे ही माहिती पोलिसांना सहा महिन्यांनंतर कळली.
KDMC employee received salary while in jail
KDMC employee received salary while in jail
advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात 3 मे 2025 रोजी स्वप्नील जोशी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. एका तरुणीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी त्याच्यानप गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तो 40 दिवस तुरुंगात होता आणि नंतर जामिनावर बाहेर आला.

मात्र अटकेच्या वेळी तो केडीएमसीच्या 'फ' प्रभाग कार्यालयात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना नव्हती. तब्बल सहा महिन्यांनी, 27 डिसेंबर 2025 रोजी पोलिसांनी महापालिकेला पत्र पाठवून याबाबत कळवले.

advertisement

तुरुंगात असतानाही हजेरी लावली कोणी?

धक्कादायक बाब म्हणजे 48 तासांपेक्षा जास्त काळ तुरुंगात असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचा नियम असताना, जोशीला 40 दिवस गैरहजर असूनही पगार देण्यात आला. त्याची हजेरी कोणी लावली आणि प्रशासनाला याची माहिती कशी मिळाली नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

सध्या महापालिकेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC : केडीएमसीच्या कर्मचाऱ्याचा अजब कारनामा, तुरुंगात असतानाही पगार जमा; आहे तरी कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल