जेलच्या मुख्य प्रवेशद्वारावरच थरार
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर काही तासांपासून कल्याणमधील आधारवाडी कारागृहसमोरील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती जेलच्या मुख्य गेटसमोर येतो आणि काही वेळात तो फटाक्यांची आतिषबाजी करतो. त्यानंतर तो मस्ती करताना रोडच्या दिशेने धावत जातो. हा सर्व प्रकार शनिवारी रात्री घडल्याचं सांगितलं जात असून आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
नेमका तो व्यक्ती होता तरी कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, आधारवाडी कारागृहासमोर फटाक्यांची आतिषबाजी करणारा तो तरुण एका कुख्यात गुंड याचा समर्थक असल्याचे समजते. जो सतीश कांबळे उर्फ सत्या भाई नावाचा आरोपी काही काळापासून जेलमध्ये आहे आणि त्या दिवशी त्या आरोपीचा वाढदिवस होता,त्यामुळे ही आतिषबाजी केल्याचे समजते. याआधीही आधारवाडी कारागृहात जेलमधून बाहेर आल्यानंतर गुंड आणि भाई लोकांच्या समर्थकांनी हुल्लडबाजी केल्याचे समोर आलेले आहे.
View this post on Instagra
या प्रकारावर पोलिसांची कारवाई होणार का?
आधारवाडी कारागृहात होत असलेल्या अशा प्रकारावर खडकपाडा पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे देखील दाखल झालेले आहेत शिवाय यावर पोलिसांनी कारवाई केली आहे मात्र या घटना काही कमी होताना दिसत नाही. पण सध्या नुकताच समोर आलेल्या या व्हिडिओमधील समर्थकावरही ठोस कारवाई झाली होती अशी मागणी होत आहे.
