महाराष्ट्रामध्ये २९ महापालिकांसाठी सगळ्याच पक्षाचे उमेदवार आता रिंगणात आले आहे. कारण, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून आता उमेदवारी अर्ज कोण मागे घेणार हे दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल. पण, निवडणुकीचे अर्ज दाखल होताच काही ठिकाणी बिनविरोध निकाल लागले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपने विजयाचं खातं उघडत हॅट्रटिक साधली आहे.
KDMC मध्ये भाजपची विजयी हॅट्रटिक
advertisement
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच रेखा राम यादव -चौधरी या प्रप्रभाग क्र. १८ (अ) मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यापाठोपाठ आसावरी केदार नवरे यांची डोंबिवलीतील प्रभाग क्र. २६ (क) मधून बिनविरोध निवड झाली आहे. तर रंजना मितेश पेणकर यांचा प्रभाग क्र. २६ (ब) मधून विजय झाला आहे. या ठिकाणी विरोधात उमेदवार नसल्यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने याठिकाणी उमेदवार दिला नव्हता, त्यामुळे भाजपचा केडीएमसीमध्ये मतदानाआधीच उमेदवाराचा विजय झाला आहे.
धुळे महापालिका निवडणुकीत भाजपचे २ उमेदवार बिनविरोध विजयी
तर धुळे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने खातं उघडलं आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 अ च्या भाजपाच्या उमेदवार उज्वला भोसले बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रति स्पर्धी समोरच्या उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाला आहे. प्रभाग क्रमांक 1 अ मधून एकमेव भाजपच्या उज्ज्वला रणजितराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज वैध झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवार उज्वला रणजीत राजे भोसले यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या त्या पत्नी आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून भाजपात प्रवेश केला होता. या विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला.
तर धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची आणखी एक जागा बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक सहा ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल पाटील बिनविरोध निवड झाली आहे. विरोधात उमेदवारी अर्ज नसल्याने ज्योत्स्ना पाटील यांचा बिनविरोध विजय झाला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटातून ज्योत्स्ना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
पनवेलमध्ये १ उमेदवार बिनविरोध विजयी
तर पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. शेकापच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील बिनविरोध निवडून आले आहे. शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने नितीन पाटील विजयी झाले आहेत. नितीन पाटील हे पालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक होते. पनवेलमध्ये भाजपने महाविकास आघाडीवर कुरघोडी करीत महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक फोडल्याने महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. पनवेल शहर ,नवीन पनवेलमध्ये महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजपला शहरात निवडणूक सोपी जाणार आहे.
