TRENDING:

Kalyan News : प्रवाशांची ट्रेन पकडण्याची घाई अन् समोरच काळ उभा; थरारक दृश्य पाहून प्रत्येकाची आरडाओरडा अन् पळापळ

Last Updated:

shocking Incident Shahad Railway Station : शहाड रेल्वे स्थानकातून एक अंगाचा थरकाप उडवणारा प्रसंग घडलेला आहे. नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानकात दिवस-रात्र मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी असते. पण अशाच एका गर्दीच्या वेळी कल्याणमधील शहाड रेल्वे स्थानकात थरकाप उडवणार प्रकार घडला,त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. स्थानकातील प्रवाशांनी या प्रकारचा कधीच विचारही केला नसेल असा प्रसंग समोर येऊन त्याच्या येऊन ठेपला.
Shahad Station in Kalyan After Snake Found
Shahad Station in Kalyan After Snake Found
advertisement

रेल्वे स्थानकात सापाचा थरार

कल्याणमधील शहाड रेल्वे स्थानकात शोभेच्या झाडांमध्ये घोणस जातीचा साप आढळल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लावलेल्या झाडांच्या जाळीत साप दिसताच प्रवासी घाबरले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच वॉर फाउंडेशनचे सर्पमित्र प्रेम आहेर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. झाडांच्या जाळीत अनेक कुंड्या आणि दाट झुडपे असल्यामुळे साप शोधणे कठीण ठरत होते. तरीही आहेर यांनी काळजीपूर्वक शोध घेतला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर साप दिसून आला आणि त्याला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले.

advertisement

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. पकडलेला घोणस साप वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली लवकरच सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रेम आहेर यांनी दिली.

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : प्रवाशांची ट्रेन पकडण्याची घाई अन् समोरच काळ उभा; थरारक दृश्य पाहून प्रत्येकाची आरडाओरडा अन् पळापळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल