नेमकं प्रकरण कायं?
मध्य रेल्वेवरील आंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या मच्छी विक्रेत्यांवर एका अज्ञात महिलेने दगडफेक केली आहे. तिने त्यांच्यावर जवळपास पाच वेळा दगडफेक केली. कोणत्याही कारणास्तव आणि अचानक त्या महिलेने रेल्वे ब्रिजवरून मच्छी विक्रेत्यांवर दगडफेक करायला सुरूवात केली. या दगडफेकीमध्ये सुदैवाने कोणालाही जीवितहानी झालेली नसून संतप्त मच्छी विक्रेत्यांनी या महिलेला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सध्या पोलिसांकडून त्या महिलेची चौकशी सुरू आहे.
advertisement
पोलिसांकडून कारवाई
विनाकारण आणि लपून महिलेने मच्छीविक्रेत्यांवर दगडफेक सुरू केल्याची माहिती मच्छीविक्रेत्यांनी दिली. घटना अचानक घडल्यामुळे सर्व मच्छी विक्रेत्यांनी संयमाने तिच्यासोबत संवाद साधला आणि तिला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे संतप्त मच्छी विक्रेत्यांनी महिलेला कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. तिला ताब्यात घेत पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली आहे. ही महिला त्या मच्छी विक्रेत्यांवर दगडफेक का करत होती? नेमकी ही महिला कोण आहे? यासह अनेक प्रश्नांची उकल आता पोलिसांकडून केली जात आहे.
सध्या कल्याण रेल्वे पोलिसांकडून महिलेसंबंधितचा अधिकाधिक तपास सुरू आहे. शिवाय, महिलेविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
