TRENDING:

अभिनेत्री अनुष्का शर्मा पिते ‘हे’ खास दूध, जाणून घ्या फायदे

Last Updated:

यामुळेच प्राणीजन्य प्रथिनं ते आहारात घेत नाहीत. यामुळे मांसाहार तर नाहीच, पण गायी-म्हशींचं दूध व त्यापासून बनवलेले पदार्थही ते खात नाहीत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा दोघंही व्हेगन आहार घेतात. यामुळेच प्राणीजन्य प्रथिनं ते आहारात घेत नाहीत. यामुळे मांसाहार तर नाहीच, पण गायी-म्हशींचं दूध व त्यापासून बनवलेले पदार्थही ते खात नाहीत. पण मग शरीराची प्रथिनांची गरज ते कशी भागवतात? त्यासाठी कोणते खास पदार्थ ते खातात, जाणून घ्या.
अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा
advertisement

भारतीय क्रिकेटर विराट कोहली त्याच्या दर्जेदार खेळासाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर तो त्याच्या व्हेगन आहारासाठीही प्रसिद्ध आहे. विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा दोघंही हाच आहार घेतात. नुकताच त्यांना मुलगा झालाय. हे परिपूर्ण कुटुंब त्यांचा आहारही परिपूर्ण आणि व्हेगनच असेल याकडे कटाक्षानं लक्ष देतं. प्राणीजन्य प्रथिनं ते आहारात घेत नाहीत. प्राण्यांचं मांस किंवा प्राण्यांपासून मिळणारे कोणतेही पदार्थ ते खात नाहीत. मग ते त्यांच्या आहारातील प्रथिनांची कमतरता कशी भरून काढतात, जाणून घ्या.

advertisement

विराट-अनुष्का कोणतं दूध पितात?

अनुष्का शर्मा बदामाचं दूध पिते. विशेष म्हणजे बदामाचं दूध ती स्वतः तिच्या घरीच तयार करते. हे दूध तयार करण्याची पद्धत खूप सोपी आहे. तिनं एका व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी सांगितली होती. ती रात्रभर बदाम भिजत घालते. सकाळी त्याची सालं काढून ते मिक्सरवर वाटून घेते.

विराट कोहली खेळाडू असल्यानं त्याच्या आहारात प्रथिनांची कमतरता असून चालत नाही. तो हिरव्या भाज्या खाऊन प्रथिनं मिळवतो. त्याशिवाय प्रोटिन शेक आणि भरपूर फळंही खातो. विराट त्याच्या व्हेगन आहाराचं कसोशीनं पालन करतो.

advertisement

बदाम दुधाचे फायदे

बदाम शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, बदामाचं दूध प्यायल्यानं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वेगानं वाढते. बदामात कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन के, ई भरपूर प्रमाणात असतं. या पोषणमूल्यांमुळे शरीराला ताकद मिळते. बदाम त्वचा आणि केसांसाठीही उपयुक्त असतात. बदामाचं दूध प्यायल्यानं शरीरातली ड जीवनसत्वाची कमतरता भरून निघते. रोज एक कप बदामाचं दूध प्यायल्यास शरीरात कॅल्शियमची कमतरता कधी जाणवणार नाही. डायबेटिसच्या रुग्णांनी साध्या दुधाऐवजी बदामाचं दूध प्यायलं पाहिजे. बदामाच्या दुधात नैसर्गिक साखरेचं प्रमाण खूप कमी असतं, तसंच फायबर भरपूर असतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

व्हेगन आहाराबाबत सध्या समाजमाध्यमांवर भरपूर चर्चा होते. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी व्हेगन आहार सुरू केलाय. विराट व अनुष्का हे त्यापैकीच. व्हेगन आहाराचं पथ्य सांभाळणं थोडं कठीण असलं, तरी अशक्य नसतं. बदाम दूध, सोयाबीनसारखे अनेक पर्याय यात उपलब्ध आहेत.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
अभिनेत्री अनुष्का शर्मा पिते ‘हे’ खास दूध, जाणून घ्या फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल