तूरडाळ खाण्याचे फायदे (Tur Dal health Benefits)
रक्तदाब नियंत्रित राहतो
ज्यांच्या रक्तदाबात चढउतार होत असतो अशा व्यक्तींनी त्यांच्या आहारात तूरडाळीचा समावेश करायला हवा. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
वजन कमी नियंत्रणात राहतं
तूरडाळीत प्रथिनांसोबत फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं. फायबर्समुळे पोट भरलेले राहून वजन कमी होण्यास मदत होते.
advertisement
पचन सुधारण्यात मदत
तूरडाळीतल्या फायबर्समुळे खाल्लेलं अन्न सहज पचायला मदत होते. अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्येपासून आराम मिळतो.
तूरडाळ खाण्याचे तोटे (Tur dal Side Effects)
तूरडाळीचे अनेक फायदे जरी असले तरीही काही रूग्णांसाठी तूरडाळ ही धोक्याची आहे. ज्या व्यक्तींना किडनी, युरिक ॲसिडचा त्रास आहे अशा व्यक्तींनी तूरडाळ खाणं टाळावं. ज्यांना ऍलर्जीचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यांनेच तूरडाळ खावी. जर तूरडाळ खाल्ल्याने काही रिॲक्शन झाली तर लगेच डॉक्टरांना जाऊन भेटा. तूरडाळ ही पचनासाठी फायद्याची जरी असली तरीही ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी रात्री तूरडाळ खाणं टाळावं. रात्री तूरडाळ खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो.
