Uric Acid : आहारातील 'या' भाज्या वाढवतात युरिक अ‍ॅसिड; तुम्हालाही त्रास असेल तर खाणं टाळाच!

Last Updated:

शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढलं तर त्याचा किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे सांधेदुखी, मुतखडा अशा व्याधी निर्माण होतात. केवळ प्राण्यांमधल्या चरबीमुळे नाही तर काही भाज्यांमुळेही हे युरिक अ‍ॅसिड वाढू शकतं.

News18
News18
मुंबई, 26 सप्टेंबर : शरीरातले सर्वच अवयव महत्त्वाचे असतात. त्यातही किडनीसारखा अवयव विशेष महत्त्वाचा असतो, कारण शरीरात तयार होत असलेला निरूपयोगी कचरा व घाण मलमूत्राद्वारे बाहेर टाकण्यासाठी किडनी काम करते. शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी किडनीचा उपयोग होतो. मात्र शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढलं तर त्याचा किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे सांधेदुखी, मुतखडा अशा व्याधी निर्माण होतात. केवळ प्राण्यांमधल्या चरबीमुळे नाही तर काही भाज्यांमुळेही हे युरिक अ‍ॅसिड वाढू शकतं. त्या कोणत्या आहेत, या बाबत ‘डीएनए’नं वृत्त दिलं आहे.
शरीरातलं युरिक अ‍ॅसिड वाढलं, तर सांधेदुखी, मुतखडा तसंच हृदयरोगही होऊ शकतो. प्युरिनयुक्त पदार्थ खाल्ल्यानं हे अ‍ॅसिड वाढतं. प्युरिनमध्ये प्राण्यांच्या प्रोटिन्सचं प्रमाण जास्त असतं. मात्र केवळ प्युरिनच नाही, तर ऑक्सालेट या घटकामुळेही युरिक अ‍ॅसिड वाढू शकतं. त्यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढलेलं असेल, तर काही पदार्थ वर्ज्य केले पाहिजेत.
पालक
पालकामध्ये अनेक जीवनसत्त्व आणि खनिजं असतात. त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्सही असतात. मात्र भरपूर पालक खाल्ल्यानं काही समस्या उद्भवू शकतात. पालकामध्ये ऑक्सालेट्स असतात. युरिक अ‍ॅसिडसाठी ते फारसं चांगलं नसतं. त्यामुळे तुमच्या शरीरातलं युरिक अ‍ॅसिड वाढलं असेल, तर पालक खाऊ नका.
advertisement
बीट
सॅलेडमध्ये, सूपसाठी, पराठ्यासाठी बीटरूटचा वापर केला जातो. यात अनेक जीवनसत्त्व आणि खनिजं असतात. आरोग्यासाठी बीट चांगलंही असतं. नियमित बीट खाल्ल्यानं आरोग्याचा अनेक तक्रारी कमी होतात, कारण यात बीटा कॅरोटिन असतं. मात्र आर्थ्रायटिसची समस्या असलेल्यांनी बीट कमी खावं.
भेंडी
अनेकांना भेंडीची भाजी खूप आवडते. मात्र भेंडीमध्ये असलेल्या अँटी ऑक्सिडंट्समुळे ते युरिक अ‍ॅसिडला आमंत्रण देऊ शकते.
advertisement
टोमॅटो
टोमॅटोमध्ये फायबर असतं. इतर काही जीवनसत्त्वंही असतात. मात्र ऑक्सालेटही भरपूर असल्यानं युरिक अ‍ॅसिड वाढल्याची समस्या असलेल्यांनी टोमॅटो खाणं कमी करावं.
शतावरी
शतावरीमध्ये ऑक्सालेट भरपूर प्रमाणात असतं. यामुळे आर्थ्रायटिसची समस्या वाढू शकते. त्यामुळे शतावरी खाणं टाळावं.
शरीरात नेहमीच युरिक अ‍ॅसिड वाढत असेल तर उच्च रक्तदाब, सांधेदुखी, अंगावर सूज, मूतखडा असे आजार होऊ शकतात. युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्हीची मदत होऊ शकते. तूरडाळ, गोड पेय, मासे, अल्कोहोल, तसंच काही भाज्या यांच्या अती सेवनानं युरिक अ‍ॅसिड वाढू शकतं. त्यावर नियंत्रण ठेवल्यास युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण कमी होतं. तसंच शारीरिक हालचाल करणंही गरजेचं असतं. त्यासाठी नियमित व्यायाम आणि भरपूर पाणी पिणं या गोष्टी कराव्यात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Uric Acid : आहारातील 'या' भाज्या वाढवतात युरिक अ‍ॅसिड; तुम्हालाही त्रास असेल तर खाणं टाळाच!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement