त्वचेची टॅनिंग घालवण्यासाठी : चहानंतर उरलेली चहापत्ती ही त्वचेची टॅनिंग घालवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तेव्हा चहाची पाने उन्हात वाळवा आणि नंतर बारीक करून त्यात बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा. आता टॅनिंग दूर करण्यासाठी गुडघे, कोपर आणि मानेवर लावा असे केल्याने तुम्ही त्वचेची टॅनिंग घालवू शकता.
केसांवर शाईन आणण्यासाठी : निरुपयोगी समजली जाणारी चहाची पाने केसांवर लावल्यास ते आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरतात. चहापत्ती पुन्हा उकळून त्याचे पाणी सामान्य होई पर्यंत वाट पहा. नंतर तुम्ही ते कंडिशनर म्हणून वापरू शकता. असे केल्याने केस चमकदार होतील.
advertisement
जखमांवर लावू शकता : चहाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे त्वचेवरील जखमा भरण्यास मदत होते. तेव्हा उरलेली चहाची पाने एकदा धुवा आणि नंतर गरम पाण्यात उकळा. आता दुखापत झालेल्या भागावर लावा आणि मग काही वेळाने धुवून टाका.
भांडी स्वच्छ करण्यासाठी : उरलेल्या चहाच्या पानांच्या मदतीने तुम्ही भांडी देखील स्वच्छ करू शकता. गाळल्यानंतर चहाची पाने स्वच्छ धुवा आणि एका पॅनमध्ये पाण्यात उकळा. आता या पाण्याने खरकटी भांडी धुतल्यास तेलाचे डाग, डाग आणि खुणा नाहीशा होतात.
कंपोस्ट खत : उरलेल्या चहापत्तीचा वापर तुम्ही कंपोस्ट खत म्हणून देखील करू शकता. परंतु चहापत्ती खत म्हणून वापरताना ती आधी स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. जेणेकरून त्याची साखर निघून जाईल. मग तुम्ही ही पावडर कुंडीत किंवा बागेच्या मातीत मिसळली तर रोपाला फायदा होईल.