TRENDING:

Blue Flag Beaches : फॅमिली असो की सोलो ट्रिप, महाराष्ट्रातले ‘हे’ समुद्र किनारे आहेत सुरक्षित आणि सुंदर पर्याय!

Last Updated:

Best Beaches for solo and family trip : ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट त्या बीचला मिळते जिथे, स्वच्छ किनारे, पाण्याची चांगली गुणवत्ता, सेफ्टी आणि पर्यावरण व्यवस्थापन अशा गोष्टी आहेत. आपल्या महाराष्ट्रातीलही काही बिचेसला हे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : महाराष्ट्रातही समुद्र किनारे अनेक आहेत, मात्र बऱ्याच लोकांना केवळ गोवा अन तिथले बीचच फिरण्यासाठी योग्य वाटतं. पण तुम्ही जर एकादी छोटी ट्रिप, विकेंड ट्रिप किंवा अगदी सोलो ट्रिप प्लॅन करत असाल तर आज आम्ही तुम्हाला यासाठी काही अतिशय उत्तम बीचेस बद्दल सांगणार आहोत. या बिचेसला ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेले आहेत.
महाराष्ट्रातील ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेले बीच..
महाराष्ट्रातील ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेले बीच..
advertisement

ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट त्या बीचला मिळते जिथे, स्वच्छ किनारे, पाण्याची चांगली गुणवत्ता, सेफ्टी आणि पर्यावरण व्यवस्थापन अशा गोष्टी आहेत. आपल्या महाराष्ट्रातीलही काही बिचेसला हे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेलं आहे. त्यामुळे आता थेट गोव्याला जाण्याची गरज नाही. तुम्ही जवळच सुंदर, निळ्याशार समुद्र किनाऱ्याचा आनंद घेऊ शकता. thelive.media या अकाऊंटवर याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. चला पाहूया ते बीच कोणते आहेत.

advertisement

महाराष्ट्रातील ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेले बीच..

श्रीवर्धन बीच : हा रायगड जिल्ह्यात आहे. त्याला ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालंय. हा बीच काळ्या वाळूसाठी, पोहण्यासाठी आणि सनसेटच्या सुंदर दृश्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे.

नागाव बीच : तुम्ही अलिबाग बीच तर पहिला असेलच. आता तिथून पुढे 9-10 किलोमीटरवर एक नागाव बीच आहे, तिथे नक्की जा. इथे तुम्हाला शांतता अनुभवायला मिळेल, भरपूर नारळाची आणि सुपारीची झाडं आहेत. इथे तुम्हाला मेडिटेशन करायचे साजेसे वातावरण दिसेल.

advertisement

पारनाका बीच : पालघरमधील पारनाका बीचलादेखील ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेलं आहे. इथे तुम्ही फॅमिली पिकनिक, सनसेट वॉक, फोटोग्राफीही करू शकता. याचा ठिकाणी तुम्हाला उंट, घोडे आणि विकेंड मार्केट्स पाहायला मिळतील. जिथे तुमचा चांगला वेळ जाईल.

गुहागर बीच : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर बीचदेखील यापैकीच एक आहे. तुम्हाला निसर्गात फिरायला आवडत असेल, तर गुहागर बीच बेस्ट आहे. तुम्ही इथे पार्टनरसोबत येऊ शकता. किंवा सोलो ट्रीपही प्लॅन करू शकता.

advertisement

लाडघर बीच : रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एक बीच आहे ज्याला, ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळाला. हा बीच तांबड्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला शांत निळाशार समुद्र, काळी दगडं आणि वॉटर स्पोर्ट्स अनुभवायला मिळेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थेट टेरेसवर भरते कवितांची मैफिल, मनाला भिडणारं संभाजीनगरमधील गेट-टुगेदर, Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Blue Flag Beaches : फॅमिली असो की सोलो ट्रिप, महाराष्ट्रातले ‘हे’ समुद्र किनारे आहेत सुरक्षित आणि सुंदर पर्याय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल