TRENDING:

मराठी भाषा दिवस विशेष : हॉटेल नाही, मॉल नाही तर थेट टेरेसवर भरते कवितांची मैफिल, मनाला भिडणारं संभाजीनगरमधील गेट-टुगेदर, Video

Last Updated:

हातात माईक, समोर आपलीच माणसं आणि वर मोकळं आकाश. असं साधं, पण मनाला भिडणारं हे टेरेस कवितांचं गेट-टुगेदर ‎जिथे प्रत्येकाला शब्दांतून स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळते. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिन्याच्या शेवटच्या शनिवारी एक भन्नाट प्लॅन ठरलेला असतो. हॉटेल नाही, मॉल नाही… थेट टेरेसवर कवितांची मैफिल! कोणी प्रेमावर बोलतं, कोणी आयुष्यावर, तर कोणी थेट शहरावरच कविता सादर करतं. ‎हातात माईक, समोर आपलीच माणसं आणि वर मोकळं आकाश. असं साधं, पण मनाला भिडणारं हे टेरेस कवितांचं गेट-टुगेदर ‎जिथे प्रत्येकाला शब्दांतून स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळते.
advertisement

छत्रपती संभाजीनगर शहरातील गिरीश जोशी यांनी 2018 सालापासून या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे. गिरीश जोशी हे एका शाळेवरती मराठीचे शिक्षक म्हणून देखील काम करतात. आपली मराठी भाषा भाषासाठी त्यासोबतच मराठी साहित्यासाठी त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. कारण की मराठी साहित्य किंवा इतरही दुसरे संमेलन मोठ्या प्रमाणात होतात, पण त्याप्रमाणे कवी संमेलन फार कमी होतात, त्यामुळे ही सुरुवात झालेली आहे. ध्यास गझल साहित्य समूह, आयोजित, टेरेसवरील कविता (कविता आणि गझलांची बहारदार मैफल) या नावाने हा कार्यक्रम घेतला जातो.

advertisement

मराठी भाषा दिवस विशेष : रंगाच्या दुनियेतल्या जादूगाराने तयार केलं ‘कवितेचं घर’, Video

दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या ग्रुपमधील कुठल्याही एका सदस्याच्या टेरेसवरती हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यांच्या या ग्रुपमध्ये 50 पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यासोबतच अगदी सहा वर्षांच्या मुलापासून ते 75 वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्व वयोगटातील सदस्य आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी कार्यक्रम होतो. यामध्ये प्रत्येक जण आपण तयार केलेली कविता सादर करतो, त्या कवितेला दाद दिली जाते, त्यासोबतच त्यात काही चुकलं असेल किंवा काही बदल हवे असतील तर ते देखील सांगण्याचे काम या ठिकाणी करतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थेट टेरेसवर भरते कवितांची मैफिल, मनाला भिडणारं संभाजीनगरमधील गेट-टुगेदर, Video
सर्व पहा

गिरीष जोशी म्हणाले की, एका सदस्याच्या आईचे निधन झालं होतं, त्यांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी कुठलाही धार्मिक कार्यक्रम ठेवण्याऐवजी कवितांचा कार्यक्रम ठेवला होता. या दिवशी सर्व आईवरील कविता आता ग्रुपमधील सदस्यांनी सादर केल्या आणि हा तो कार्यक्रम त्यांचा खूप छान प्रकारे झाला होता. तर अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम घेतो, असं जोशी यांनी सांगितलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठी भाषा दिवस विशेष : हॉटेल नाही, मॉल नाही तर थेट टेरेसवर भरते कवितांची मैफिल, मनाला भिडणारं संभाजीनगरमधील गेट-टुगेदर, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल