मराठी भाषा दिवस विशेष : रंगाच्या दुनियेतल्या जादूगाराने तयार केलं ‘कवितेचं घर’, Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सुनील उबाळे व्यवसायाने पेंटर, पण मनाने कवी. दिवसभर भिंतींना रंग देणारे हे हात, कवितेतून भावनांनाही रंगवतात.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचे सुनील उबाळे व्यवसायाने पेंटर, पण मनाने कवी. दिवसभर भिंतींना रंग देणारे हे हात, कवितेतून भावनांनाही रंगवतात. अनेक कवी संमेलनांमध्ये सादरीकरण, दोन कवितासंग्रह प्रकाशित आणि त्यांचं घरच ओळखलं जातं ‘कवितेचं घर’ म्हणून. छतावर दिग्गज कवींची नावं आहेत.
सुनील उबाळे यांचं शिक्षण सहावी पर्यंत झालेलं आहे. लहान असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे घरातील सगळी जबाबदारी त्यांच्यावरती पडली. घरची परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे त्यांना अगदी लहान वयापासून काम करावं लागलं. त्यांनी काही दिवस वीटभट्टीवरती काम केलं. त्यानंतर काही दिवस माती काम केलं आणि त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून ते हे घराला रंग देण्याचं काम करतात. त्यांना बालपणापासूनच कविता करण्याची आवड होती. शिक्षण जास्त झालं नव्हतं तरी देखील ते कविता करायचे आणि अनेक ठिकाणी त्यांनी कविता सादर केली. अनेक चढउतार आले, अनेक ठिकाणी नकार दिला, पण त्यांनी त्यांच्या कविता करण्याचं काम सुरू ठेवलं.
advertisement
एका कवी संमेलनामध्ये त्यांनी त्यांची कविता सादर केली आणि तिथून त्यांना खरी ओळख मिळायला सुरुवात झाली. त्यांनी आत्तापर्यंत दोन कवितासंग्रह प्रकाशित केलेले आहेत. त्यांच्या उलट्या काडीच्या घराला अनेक असे पुरस्कार देखील राज्य शासनाकडून भेटलेले आहेत. अजून देखील ते घराला रंग काम करतात. विशेष म्हणजे त्यांच्या घराच्या भिंतीवरती अगोदर कविता लिहिलेल्या होत्या पण काही कारणामुळे त्यांचं घर पडलं, त्यानंतर त्यांनी नवीन घर बांधलं आणि घराच्या छतावरती त्यांनी महाराष्ट्रातले जेवढे काही कवी आहेत, तेवढ्या सर्व कवींची नावे लिहिलेली आहेत.
advertisement
घराच्या छतावर जेवढ्या कवींची नावे आहेत ते सर्व कवी यांच्या घरी येऊन गेलेले आहेत. घरावरती आपलं नाव पाहिलं, त्यासोबत सेल्फी घेतला अशा पद्धतीने सर्व कवी माझ्या घरी येऊन गेलेले आहेत आणि आज माझ्या घराला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कवितेचे घर म्हणून ओळख मिळालेली आहे यासाठी मला खूप आनंद होतो, असं सुनील उबाळे म्हणतात.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 7:49 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
मराठी भाषा दिवस विशेष : रंगाच्या दुनियेतल्या जादूगाराने तयार केलं ‘कवितेचं घर’, Video







