advertisement

Success Story : आयटीत रमलं नाही मन, नवनाथ यांनी घेतला दुग्ध व्यवसायाचा निर्णय, महिन्याला एवढी कमाई

Last Updated:
नवनाथ ही एका आयटी कंपनीत चांगल्या पदावर काम करत असताना, त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पिढीजात चालत आलेल्या शेतीसोबतच दुग्ध व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. या व्यवसायातून ते आता चांगला नफा मिळवत आहेत.
1/5
आयटी क्षेत्रात मोठ्या पगाराची नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु काही जण वेगळ्या मार्गाचा आणि ध्येयाचा पाठलाग करतात. त्यापैकी एक म्हणजे पुण्यातील पुनावळे येथील नवनाथ कुदळे. नवनाथ ही एका आयटी कंपनीत चांगल्या पदावर काम करत असताना, त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पिढीजात चालत आलेल्या शेतीसोबतच दुग्ध व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. या व्यवसायातून ते आता चांगला नफा मिळवत आहेत.

2/5
बाणेर येथील आयटी कंपनीत नवनाथ कुदळे यांनी काही काळ नोकरी केली. पण त्यांना नोकरीमधून मानसिक समाधान मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

3/5
त्यांच्या या निर्णयात पत्नी हर्षदा कुदळे यांनीही खंबीर साथ दिली. दोघांनी मिळून शेती आणि दुग्ध व्यवसायात करिअर घडवण्याचा मार्ग निवडला.

4/5
नवनाथ यांनी वाकड येथून B.Sc कॉम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण असूनही त्यांनी संगणकाऐवजी गायी-म्हशींसोबत राहणं पसंत केलं. या व्यवसायात मला खरं समाधान मिळतं, असे ते सांगतात.

5/5
नवनाथ कुदळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुनावळे गावात गोठा उभारला आहे. मुऱ्हा जातीच्या 5 म्हशी, तसेच गीर आणि साहिवाल अशा 4 देशी संकरित गायी त्यांच्याकडे आहेत. दररोज सरासरी 60 लिटर दूध उत्पादन होते. गायींचे दूध 9 ते 10 लिटरपर्यंत जात आहे. कुदळे यांचा महिन्याचा खर्च सुमारे 1 लाख रुपये असून, 30 ते 35 हजार रुपयांचा नफा मिळवतात. ते स्वतः दुचाकीवरून पुनावळे आणि परिसरात दूध पोहोचवतात. म्हशीच्या दुधाचा दर 85 ते 90 रुपये लिटर आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement