advertisement

'देवाच्या कृपेने वाचले', ऐश्वर्या नारकर यांना फ्रॉड कॉल; सांगितला संपूर्ण शॉकिंग प्रकार

Last Updated:
चिन्मय मांडलेकर आणि ऐश्वर्या नारकर यांना फ्रॉड कॉल आला होता.. त्यांनी सतर्क राहून फसवणूक टाळली आणि सर्वांना स्कॅमपासून सावध राहण्याचं आवाहन केलं.
1/10
ऑनलाईन फ्रॉकची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या पत्नीला देखील बिल भरण्याच्या बहाण्याने एक फ्रॉड कॉल आला. 30 मिनिटांत पैसे भरा नाही तर कनेक्शन कापू असं सांगण्यात आलं. पण वेळीच प्रकार लक्षात आल्यानं फसवणूक झाली. अशाच प्रकारच्या फसवणूकीचा कॉल अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना देखील आला होता. त्यांनी व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रकार सांगितला. तसंच सगळ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं.

2/10
ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलं,
ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलं, "एका स्कॅममधून देवाच्या कृपेने वाचले म्हणून हा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करतेय. 4-5 दिवसांपूर्वी मला व्हॉट्सअॅपवर महानगर गॅसकडून मेसेज आला होता. तुमच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम झालाय. तुमचा गॅस आज संध्याकाळी कट केला जाईल."
advertisement
3/10
"मला एक विचार आला की, बिलची हार्ड कॉपी आली की मी लगेच भरून टाकते त्यामुळे बिल पेंडिंग असण्याचा काही संबंधच नाही. मी त्यांना मेसेज केला की, मला बिल मिळालेलंच नाही. मला डायरेक्ट त्यांचा व्हॉट्स अॅप कॉल आला. ते पेज खूप ऑथेंटिक वाटत होतं. त्यांचा लोगो वगैरे होता."
advertisement
4/10
ऐश्वर्या नारकर पुढे म्हणाल्या,
ऐश्वर्या नारकर पुढे म्हणाल्या, "माझा स्वभाव फटकळ असल्याने माझा सूर तसाच होता की मी सगळे बिलं भरली आहेत. मी त्यांना म्हटलं की, तुमची हार्ड कॉपी आलेली नाही. मी आत्तापर्यंतची तुमची सगळी बिलं भरली आहेत. तर तुम्ही माझं कनेक्शन कसं काय बंद करू शकता?"
advertisement
5/10
"तर तो म्हणाला की बिल भरण्यासाठी हे नाही. आम्ही सॉफ्टवेअर अपडेट करतोय. आणि त्या सॉफ्टकॉपी येण्यासाठी तुमचं अपग्रेडेशन झालेलं नाहीये आणि त्यासाठी तुमचं कनेक्शन कट केलं जाईल. मी म्हटलं की हा मुद्दा मला कळत नाहीये."
advertisement
6/10
"तर त्याने सांगितलं की काही हरकत नाही. मी तुम्हाला एक लिंक पाठवतो. त्यावर तुम्ही एक्टिव्हेशन केलं तुमचं सॉफ्ट कॉपीसाठी अपग्रेडेशन होईल आणि कनेक्शन बंद होणार नाही."
advertisement
7/10
ऐश्वर्या नारकर म्हणाल्या,
ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "तोपर्यंत मला हे कळतंच नव्हतं की हा फ्रॉड कॉल आहे. मी त्यांना म्हटलं ठीक आहे पाठवा. त्यांनी जी फाइल पाठवली ती apk फाइल होती. हे मी ऐकलं होतं की apk फाइल या स्कॅमच्या फाइल असतात. त्याने मला सांगितलं की यावर क्लिक करून मी सांगतो तसे डिटेल्स भरा. पण लकीली माझा आयफोन असल्याने त्या फाइलवर क्लिकच होत नव्हतं".
advertisement
8/10
 "मग मी त्याला म्हटलं की तुम्ही apk फाइल का पाठवली आम्हाला वेबसाइट सांगा. तिथे काय करायचंय ते आम्ही करतो. तर त्याने मला विचारलं की तुमचा कुठला फोन आहे. मी त्याला सांगितलं की आयफोन आहे. तो म्हणाला, अँड्रॉइड नाहीये का? अँड्रॉइड फोनमधून ओपन करा. मग मला शंका आली. त्याने मला विचारलं की, तुमचा मीटर कुठे आहे. म्हटलं त्याच्याशी तुला काय करायचं आहे. मी त्याला म्हटलं की जे काही करायचंय ते मी ऑफिशियल वेबसाइटवर करेन. असं म्हटल्यावर त्याने कॉल कट केला."

9/10
ऐश्वर्या नारकर यांनी चाहत्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या,
ऐश्वर्या नारकर यांनी चाहत्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या, "मला एवढंच सांगायचं आहे की असा कुठला बँकिंग किंवा असा कुठलाही फोन आला तर त्याला प्रतिसाद देऊ नका. तुम्हाला जर वाटलं तर विचार करायला वेळ घ्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेचच कोणतीही अॅक्शन करू नका."
advertisement
10/10
 "हे सगळे मोठे स्कॅम सुरू आहेत. यातून तुम्ही नक्कीच वाचू शकता. कारण आपण ज्यावेळेस त्यातून जात अशतो तेव्हा आपल्याला अंदाजच येत नाही की आपण कोणत्यातरी स्कॅममध्ये फसतो आहोत. त्यामुळे प्रत्येकवेळी थोडा विचार करायला वेळ घ्या. त्यांना सांगा आम्ही तुम्हाला नंतर कॉल बॅक करू. प्रत्येक गोष्टीवर आपल्याकडे उपाय योजना आहेत. त्या आपण करू शकतो. त्यामुळे पटकन अशा अँक्शन रिअँक्शनच्या मोहात पडू नका. घाबरू नका."

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement